ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी ११ वाजता ठाण्यात येणार आहेत. यावेळी ते नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.२०१९ च्या निवडणुका विचारात घेऊन राज हे ठाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भेटणार आहेत. कोर्टनाका येथील विश्रामगृहामध्ये ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाºयांशी संवाद साधून त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा ते घेणार आहेत.यावेळी ठाणे शहरासह शहापूर, भिवंडी, कल्याण येथील पदाधिकाºयांच्या नियुक्त्यादेखील ते करणार असल्याचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले. सुधाकर चव्हाण, निलेश चव्हाण यांना पक्षात परत घेण्याबाबत राज पदाधिकाºयांशी चर्चा करतील का, तसेच पक्षातील नाराज मंडळींशी चर्चा करतील का, अशी मनसैनिकांमध्ये कुजबूज सुरू आहे.
राज ठाकरे उद्या ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 3:42 AM