बदलापूर - बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.या शहरात तब्बल नऊ वर्षांनंतर राज आले असता त्यांना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मान्य केले. सध्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने पक्ष संघटनाबांधणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज कार्र्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत आपला कबुलीनामा दिला. बदलापूर शहर मराठी माणसांचे असतानाही तुम्हाला शहरात पुन्हा येण्यासाठी नऊ वर्षे का लागली, असा प्रश्न विचारल्यावर या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही, असे ते म्हणाले. तर, मनसेला विधानसभा निवडणुकीत ४६ हजार मते मिळाली होती. मनसेच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा ओघ का घसरला, असा प्रश्न विचारल्यावर त्याचेदेखील उत्तर माझ्याकडे नाही. संघटना सक्षम करणे, हा दौऱ्यामागील उद्देश असल्याचे राज यांनी नमूद केले.बदलापूरच्या परिस्थितीबाबत विचारले असता बदलापूरप्रमाणेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचे लोंढे वास्तव्यासाठी येत आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात रिक्षांना परमिट देताना सरकारकडे प्रत्येक शहराची माहिती असणे आवश्यक होते. मात्र, माहिती नसतानाही सरसकट प्रत्येक शहरात परमिट देण्यात आले. त्यामुळे रिक्षा ठेवायची कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. देश आणि राज्यात बेकायदा कामे आणि प्रवृत्तींना संरक्षण देण्याचे काम होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.चर्चेविनाच परतावे लागले मान्यवरांनाराज ठाकरे हे बदलापूरमधील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेणार होते. त्यासाठी सकाळी १० वाजता अनेक मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. मात्र, राज यांनी पत्रकार परिषद झाल्यावर लागलीच निघण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दोन तास राज ठाकरेंची वाट पाहणाºया प्रतिष्ठित नागरिकांना आणि डॉक्टरांना चर्चा न करताच परतावे लागले.भविष्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढणार - राजअंबरनाथ : एकट्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. सोबत जिल्हा परिषदेचा मोठा भागही समाविष्ट आहे. परप्रांतीयांचे सर्वाधिक लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत आहे. भविष्यातही त्यात वाढ होणार आहे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्तकेले.राज यांनी अंबरनाथ दौºयादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी शहरातील समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली. या सर्व समस्यांवर उत्तर देताना राज यांनी ठाणे जिल्ह्याची अवस्था मुंबई सारखी झाली आहे, असेसांगितले.प्रत्येकजण हा मुंबई आणि ठाण्यातच स्थायिक होत आहे.परराज्यातील सर्व लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.हे रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोबत औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना या पुढे ८० टक्के कामगार स्थानिक बेरोजगारांसाठीच राखीव ठेवण्यासाठी भाग पाडले जाईल असे मत त्यांनी व्यक्तकेले.दौºयाच्या दिवशीच गटबाजी उघडअंबरनाथ मनसेमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले शहरातील बॅनर शुक्रवारी पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांनीच उतरवले. एकमेकांना शह देण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.अंबरनाथ पालिका निवडणुकीतील वाद हा राज यांच्या दौºयाच्या दिवशी पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यांच्या स्वागताचे ६ ते ७ बॅनर काही माजी सभापतीने लावले होते. हे बॅनर पाहून मनसेच्या काही पदाधिकाºयांनी माजी सभापतींचे बॅनरच रात्रीच उतरवत दुसरे बॅनर लावले.मनसेतील अंतर्गत गटबाजी या दौ-याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. माजी सभापती आणि एका पदाधिकाºयामधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र दौरा असल्याने दोन्ही गटांनी शांततेची भूमिका घेतली.
पक्ष संघटनेकडे झाले दुर्लक्ष, राज ठाकरे यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:37 AM