कल्याण : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कामगारांनी संप पुकारला होता. एक दिवस संपात सहभागी झाल्यास सात दिवसांचा पगार कापण्याची मनमानी एसटी प्रशासनाकडून केली जाणार आहे. एसटी कामगारांचा पगार कापू नये, अशी सूचना एसटी महामंडळास करण्यात येणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.मनसे परिवहन कामगार सेनेच्या कल्याणमधील पदाधिकाºयांनी सोमवारी सायंकाळी ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी संघटनेचे मोहन तावडे, विकास आकलेकर, महादेव म्हस्के उपस्थित होते.दोन वर्षांपूर्वीही एसटी कामगार त्यांच्या न्याय हक्कासाठी संपावर गेले होते. एक दिवस संपात सहभागी झालेल्या कामगारांचा सात दिवस पगार कापला. तोच प्रकार पुन्हा नुकत्याच झालेल्या संपानंतर प्रशासनाकडून सुरू असल्याचे पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.एसटी कामगार संघटनेच्या कृती समितीने पुकारलेला संप सुरुवातीस न्यायालयाने कायदेशीर ठरविला. त्यानंतर तो बेकायदा ठरविला. त्यामुळे तो मागे घेण्यात आला. परंतु, सुरुवातीला न्यायालयाने संप कायदेशीर ठरवल्यामुळे तो प्रशासनाला बेकायदा ठरवता येणार नाही. संप काळातील पगार दिला जावा, यासाठी कामगार आग्रही नाहीत. मात्र, प्रशासन एक दिवसाच्या पोटी सात दिवसाचा पगार कापण्याचे म्हणते, ते बेकायदा आहे. संपात एसटी महामंडळाचे चार दिवसांत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कामगारांना पगार तुटपुंजे आहे. त्यांच्या वेतनातून रक्कम कापून एसटी महामंडळाचे नुकसान कसे काय भरून निघेल, असा सवालही कामगार सेनेच्या पदाधिकारी वर्गाकडून या वेळी उपस्थित करण्यात आला.सातव्या वेतन आयोगाची मागणी कामगारांनी केली आहे. वेतन वाढले पाहिजे ही मागणी रास्त आहे. या मागणीस मान्यता मिळाल्यावर केवळ कामगारांचे पगार वाढणार नाहीत. तर प्रशासनातील अधिकारी वर्गाचेही पगार वाढणार आहे. मात्र, संपात सहभागी असलेल्या कामगारांविरोधात अधिकारी वर्गाने कारवाईची भाषा केली. प्रशासनाच्या बाजू राखण्याचे काम केले. त्यांना पगार नको कारण त्यांच्याकडून भ्रष्टाचार केला जात आहे. त्यांचा भ्रष्टाचार उघकीस आणणे गरजेचे आहे. भ्रष्ट अधिकाºयांचा भ्रष्टाचार उघकीस आणल्यावर ते उघडे पडतील या मुद्यावर ठाकरे यांनी जोर दिला आहे.>महामंडळाशी लवकरच बोलणीकामगारांच्या मागण्यासंदर्भात एसटी महामंडळाशी लवकरच बोलणी केली जाईल. उच्च स्तरीय समितीचा अहवाल काय येतो. ते पाहून पुढील पाऊल उचलले जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करण्यासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे त्यावर भाष्य करणे ठाकरे यांनी टाळले. कामगारांच्या अनेक मुद्यावर या वेळी पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात आली. पदाधिकाºयांनी एक निवेदन ठाकरे यांना या वेळी सादर केले.
संपकरी कामगारांचा पगार कापू नका, राज ठाकरे यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:58 AM