कल्याण- मोहने परिसरात राहणा-या राजेश भंडारी या तरुणाने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमुळे त्याच्या आत्महत्येचा तपास सुरू झाला आहे. त्याला एका तरुणीने धोका दिल्याने त्याने आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे. पोलिसांनी हा व्हिडोओ पाहून पुढील तपास सुरू केला आहे. राजेशने रेल्वे स्थानकात आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सुसाईड व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओत त्याला एका तरुणीपासून त्रास होता. तिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. तिच्या त्रसाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. हा व्हिडीओ मोबाईलमध्ये असून त्याचा पासवर्ड मित्र सन्नी याला दिला आहे. हा मोबाईल पासवर्ड आत्महत्येपश्चात सन्नीने त्याच्या भावाला हा पासवर्ड द्यावा, असे त्यात म्हटले आहे. राजेश हा मोहने परिसरात राहत होता. त्याच परिसरात राहणा-या एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. त्याने तिच्यासोबत लग्न करायचे ठरविले होते. त्या पश्चात असे काय घडले. त्यामुळे तिने राजेशला असा काय धोका दिला. त्यानंतर त्याने थेट जीवनयात्रा संपविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग निवडला.आत्महत्येपूर्वी सुसाईड व्हिडीओ करणे आणि फेसबूक लाईव्ह करणे हे आत्महत्येचे फॅड समाजात वाढीस लागले आहे. प्रेम प्रकरणात आपेक्षा भंग झाल्यावर तरुणाईला मानसोपचारांच्या समुपदेशनाची गरज असते. हेच समुपदेशन कमी पडत आहे. त्याला समुपदेशन मिळाले असते तर कदाचित राजेश प्रेमभंगाच्या धक्क्यातून सावरला असता. त्याच्या कुटुंबाचा आधार गेला नसता. या सगळ्य़ा गोष्टीवर आता चर्चा सुरू झाली आहे. राजेशला धोका देणारी ती तरुणी कोण, तिने असे काय केले होते, राजेशचे ज्याच्यामुळे राजेशचा मनोभंग झाला होता. पोलिसांनी सुसाईड व्हिडीओच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. तपासाअंती राजेशच्या आत्महत्येविषयीचे खरे कारण समोर येणार आहे.
राजेश भंडारी या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:58 PM