उल्हासनगर : जागतिक एड्स दिन व आत्महत्या जनजागृती कार्यक्रम निमित्त सकाळी मध्यवर्ती रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली. रॅलीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली असून त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जाफर चौधरी, डॉ जनार्धन निंभोरे डॉ महेंद्र केंद्रे आदी जण उपस्थित होते.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने काढलेल्या रॅलीत एड्स बाबतची माहिती देण्यात आली. रॅलीमध्ये विविध कॉलेजचे विद्यार्थी, एन एस यू युनीटचे विद्यार्थी व विद्यार्थिनी त्याचबरोबर किन्नरअस्मिता संस्था, आदिती आनंदी सामाजिक संस्था, आलायन्न्स सामाजिक संस्था, NTP CSE विहान सामाजिक संस्था,दिव्यांग चॉरिटेबल ट्रस्ट, इंडियन सायक्याट्रीक सोसायटी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक एडस दिनानिमित्त एडस या आजारावर जनजागृती सोबतच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधे व्यक्तीचा ताणतणाव वाढत असून परिणामी आत्महत्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे सदरच्या मानसिकतेत बदल व्हावा व आत्महत्यावर प्रतिबंधीत उपाययोजना करिता आवश्यक उपचारपद्धती व माहितीफिती दाखविण्यात आली.
मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, डॉ. तेजस्विनी भगत रेडिओलॉजिस्ट, डॉ. दिपक राठोड अध्यक्ष विभागीय इंडियन सायक्याट्रिक सोसायटी पश्चिम भारत, डॉ. वर्षा दावानी मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. संजय कुकडे मेडिकल ऑफिसर, सतिश वाघ समाजसेवा अधिक्षक , सुमन गोवंदे मेट्रन, कुमार गायकवाड समाजसेवा अधिक्षक, रुग्ण मित्र भरत खरे रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सेवासदन कॉलेजचे प्रा. डॉ. ढोके , वेदांता कॉलेज विठ्ठलवाडीचे प्रा. योगेश पाटील, आय टी आय कॉलेज कल्याणचे जाधव, साधुबेला कॉलेजचे प्रा. राजेश सिंग, प्रा. सोफी मेथु आदी जण उपस्थित होते.