ठाणे : दूध दरवाढीबाबत राजू शेट्टी यांनी पुकारलेले आंदोलन चुकीचे असून दुधाला दर मिळावा, म्हणून शासनाने आधीच तीन रुपयांची दरवाढ दिलेली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी पुकारलेले आंदोलन तत्काळ मागे घेऊन पुन्हा एनडीएमध्ये सामील व्हावे, असे आवाहन रिपाइंचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी ठाण्यात केले. रिपाइंने येत्या आॅक्टोबरमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत रिपाइंचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे उपस्थित होते.मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेतलेले आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीसुद्धा मान्य केलेल्या आहेत. तसेच शेतकºयांना दीडपट हमीभाव दिलेला आहे. त्यामुळे शेट्टी यांनी आपले आंदोलन मागे घेऊन एनडीए सरकारला सहकार्य केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी विशद केली. संभाजी भिडे यांनी संत तुकाराम आणि ज्ञानदेवापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे सांगून पुन्हा अंधश्रद्धा पसरवण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांवर, सभांवर बंदी आणून त्यांना अटक करावी, अशी मागणी पुन्हा आठवले यांनी यावेळी केली.येत्या ३ आॅक्टोबर २०१८ रोजी रिपाइंचा ६१ वा वर्धापन दिन सोहळा असून तो ठाण्यात साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरातून एक लाख अनुयायी उपस्थित राहतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ५० टक्के जागा रिपाइं इतर समाजातील व्यक्तींना देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.>त्या समाजात फूट पाडणारज्या पद्धतीने मराठा समाजाने दलितांमध्ये फूट पाडली, त्या धर्तीवर रिपाइंसुद्धा मराठा समाजातही फूट पाडणार असून त्या समाजातील मंडळींना आपल्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य आठवले यांनी यावेळी केले.
दूध दरवाढीसाठीचे आंदोलन मागे घ्यावे- रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:53 AM