अरविंद म्हात्रे , चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागातील प्रभाग २९, रामदासवाडी हा प्रभाग झोपडपट्टी आणि चाळघरांच्या वसाहतींचा आहे. या प्रभागात बिर्ला महाविद्यालय, हाय वे रोड ते पौर्णिमा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उगमस्थानावरच प्रातर्विधी होत असल्याने येथे कायमची दुर्गंधी असते. शासनाच्या हगणदारीमुक्त परिसर या योजनेचा येथे बट्ट्याबोळ झालेला दिसतो.हल्ली ग्रामीण भाग बऱ्याच अंशी हगणदारीमुक्त झालेला असताना कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत मुख्य रस्त्यावरच घडणारा हा प्रकार स्वच्छता अभियानाला कलंक आहे. या प्रभागात इंदिरानगर ते प्रेम आॅटोमार्गे मुरबाड रोड, पौर्णिमा चौक परिसरातील रामदासवाडी, मंदार सोसायटी, नवरंग हाऊसिंग सोसायटी, ब्राह्मण सोसायटी, पौर्णिमाजवळील भोईरवाडी, माळी समाज हॉल परिसर, पाठकवाडी, दीपश्री, आशापुरा, पांडेचाळ, न्यू कल्पतरू, आवास सोसायटी आदी परिसरांचा समावेश होत असून इंदिरानगर या झोपडपट्टीत पायाभूत सुविधांची कायम ओरड असते. हनुमान मंदिरासमोरच कचऱ्याची रास रस्त्यावरच असते. हा रस्ता हमरस्ता असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. माळी समाज हॉल ते गणेश मंदिर या रस्त्यालगत नवरंग को-आॅप. हाऊसिंग सोसायटी, चाळघरांची वसाहत आहे. येथे रस्ता अत्यंत खराब झालेला असून पायवाटा नाहीत. तसेच लक्ष्मी कॉलनीत बऱ्याच ठिकाणी पायवाटांचे पेव्हरब्लॉक निखळलेले असून पाण्याची ओरड आहे. याच प्रभागात मंदार सोसायटीजवळ साहित्यिक वि.वा. बुवा उद्यान असून उद्यानासमोरील कचऱ्याचे ढीग उद्यानात येणाऱ्यांचे स्वागत करतात. साफसफाईत अनियमितता आहे
रामदासवाडीत दुर्गंधी
By admin | Published: July 11, 2015 3:17 AM