ठाणे: अभिनय कट्ट्यावर पं. हरिप्रसाद चौरासीया यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त संगीताचा बहारदार कार्यक्र म सादर झाला. यात विनोद पवार, ज्ञानेश्वर मराठे, राजू पांचाळ, निशा पांचाळ, किरण म्हापसेकर, प्रणव कोळी, श्रेया वारे, सायली आंगणे या कलाकारांनी गाणी सादर केली.पं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील संगीत कट्ट्यावर त्यांच्या गाण्यांचे आयोजन केले होते. या कार्यक्र मात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांतील सुप्रसिद्ध गाणी सादर करण्यात आली. १ जुलै १९३८ साली चौरासीया यांनी एका सर्व सामान्य घरात जन्म घेतला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वडील पैलवान असल्याने मुलाने देखील पैलवानच व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र गाण्यात मन रमत असल्याने त्यांनी गाण्याकडेच आपले लक्ष केंद्रित केले. पुढे त्यांनी पंडित भोलानाथ यांच्याकडे बासरी वाजनाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी यशस्वीरित्या वाटचाल केली. चांदनी, सिलिसला, डर, लम्हे, फासले, साहिबां, परंपरा यांसारख्या सुपरहिट सिनेमांना त्यांनी संगीत दिले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्यांनी गुरु शिष्य परंपरा जोपासत वर्सोवा येथील आपल्या राहत्या घरी वृंदावन गुरु कुल हा उपक्र म सुरू केला आहे. यावेळी कट्ट्याच्या कलाकारांनी ‘तेरे मेरे ओठो पे’, ‘मेरे हाथो मे नौ नौ चुडिया है’, ‘जादू तेरी नजर’ तसेच ‘रंग बरसे...’ अशी अनेक चौरासीया यांची गाणी गायली. संगीत कट्ट्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी तेथे गर्दी केली होती. विनोद पवार, ज्ञानेश्वर मराठे, राजू पांचाळ, निशा पांचाळ, किरण म्हापसेकर, प्रणव कोळी, श्रेया पवार, सायली आंगणे या कलाकारांनी गाणी सादर केली. कट्ट्याचे निवेदन सहदेव कोळंबकर तर दीपप्रज्वलन वनिता कांबळे यांनी केले. कट्ट्याच्या माध्यमातून नवनवीन कालकारांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही संगीत कट्ट्यामार्फत करत आहोत असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले. संगीत कट्ट्याचे आयोजन किरण नाकती व अभिनय कट्ट्याच्या सर्व कलाकारांनी केले
ठाण्यातील संगीत कट्ट्यावर रंगली पं. हरिप्रसाद चौरिसया यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधूर गाण्यांची मैफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 3:09 PM
पं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या संगीताचा कार्यक्र म अभिनय कट्ट्यावर आयोजित केलेल्या संगीत कट्ट्यावर संपन्न झाला.
ठळक मुद्देसंगीताचा बहारदार कार्यक्र म सादरपं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजनसंगीत कट्ट्याच्या माध्यमातून नवनवीन कालकारांना संधी देण्याचा प्रयत्न - किरण नाकती