शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

रंगीलो म्हारो घागरो...

By admin | Published: September 28, 2016 4:28 AM

एरव्ही घागऱ्याला नाही म्हणणाऱ्या तरुणींची पावले नवरात्र जवळ आले, की घागरा खरेदीकडे वळवतता. घागऱ्यात नाविन्य शोधणाऱ्या तरुणींसाठी यंदा एकापेक्षा एक आकर्षक घागरे आले

- प्रज्ञा म्हात्रे , ठाणेएरव्ही घागऱ्याला नाही म्हणणाऱ्या तरुणींची पावले नवरात्र जवळ आले, की घागरा खरेदीकडे वळवतता. घागऱ्यात नाविन्य शोधणाऱ्या तरुणींसाठी यंदा एकापेक्षा एक आकर्षक घागरे आले आहेत. नेटच्या फॉर्ममध्ये असलेला आणि तीन लेयर्सचा ‘सनेडो घागरा विथ नेट’ आणि ‘कली घागरा’ यंदाच्या गरब्याचे आकर्षण ठरणार आहे. या दोन पॅटर्नच्या घागऱ्यांची भरपूर खरेदी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हे घागरे कच्छच्या भुजोडीतून आणि अहमदाबाद येथून आलेले असल्यामुळे त्यावर पारंपरिक छाप आहे. गरब्यासाठी घागरा म्हटला की सनेडो घागऱ्यावरच पहिली नजर जाते. सध्या नेटची साडी, नेटच्या ड्रेसची फॅशन आहे. याच नेटचा वापर सनेडो घागऱ्यात केला आहे. पहिला लेयर हा ब्रासो नेट, दुसरा लेयर हा प्लेन नेट तर शेवटचा आणि घेरदार लेयर हा जामावरम कपड्याचे कॉम्बिनेशन असलेला हा घागरा आहे. त्याची किंमत २५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे. सनेडो घागऱ्याबरोबर कली घागरा सर्वांत प्रसिद्ध आणि तरुणींमध्ये क्रेझ असलेला आहे. रंगीबेरंगी एकेका कपड्याची कली बनवून हा घागरा तयार केला आहे. तो दोन रंगांपासून सुरू होतो तो पार १० रंगांपर्यंत आणि आठ कलीपासून तो ८० कलीपर्यंतच्या प्रकारांत मिळतो. केवळ मोठ्या मुलींसाठी नव्हे तर लहानमुलींसाठीही असा घागरा उपलब्ध असल्याचे दीप्ती वोरा यांनी सांगितले. मोरांची डिझाईन्स आणि घेऱ्याला कट वर्क असलेला ‘मोरनी कट घागरा’ही पाहायला मिळत असून त्याची किंमत तीन हजार रुपये आहे. गुजरातचे पारंपरिक बावरीया वर्क त्यावर केले आहे. हाताने नक्षीकाम केलेला ‘आरी वर्क घागरा’, ‘दांडिया रास घागरा’, सिल्क मटेरियलचा वापर करुन हाताने कच्छी नक्षीकाम केलेला ‘प्युअर कच्छी वर्क घागरा’ असे विविध घागरे गरब्यनिमित्त उपलब्ध आहेत. अहमदाबादी भरतकाम केलेले आणि मिरर वर्क असलेला ‘नाडा छेडी घागरा’ही पहिल्याच नजरेत पसंतीस उतरतो, असे कल्पना गाला यांनी सांगितले. ‘सनेडो घागरा विथ तोरण’ अशा प्रकारचा आगळा वेगळा घागरा लहान मुलींसाठी उपलब्ध आहे. एक हजार रुपयांपासून त्याची किंमत आहे. आठ ते १२ वयोगटातील मुलींसाठी ‘लाईट वेट घागरा विथ पोपट वर्क’, ‘पंचरंगी विथ तोरण’ असे घागरे आहेत. ८०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. आकर्षक फेटेघागऱ्याबरोबर यंदा फेट्याचीही क्रेझ दिसून येते. साधी कॅप, मुर्गा कॅप, राजस्थानी पगडी फेटा, तुतारी फेटा, साफा फेटा असे नानाविध फेट्यांचे प्रकार असून २०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. यात राजस्थानी पगडी फेटा आणि मुर्गा फेट्याची जास्त चलती असल्याचे कल्पना यांनी सांगितले. जॅकेटचेही नाना प्रकारगरब्यात आता घागऱ्यानंतर प्राधान्याने जॅकेटकडे पाहिले जाते. कॉलर नेक, व्ही नेक, मिरर वर्क जॅकेट, भरतकाम केलेले जॅकेट अशा नानाविध प्रकारांची जॅकेट ४०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत. ‘गेट अप’ला जोड दागिन्यांचीगरब्यात आॅक्साईड ज्वेलरी प्रामुख्याने विक्रीसाठी उपलब्ध असते. बदलत्या काळानुसार तरुणाईच्या पसंतीतही मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला आहे. यंदा कलरफुल आॅक्साईड ज्वेलरीची जास्त क्रेझ आहे. यात कलरफुल बीट्स आणि मोती यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कमरपट्टा, माँग टिका, बलैय्या, कलरफुल छल्ला, कलरफुल कडी, आॅक्साईड कलरफुल कडे, गोल्डन कलरमध्ये असलेले आॅक्साईड अ‍ॅण्टिक पॉलीश कडे, हासडी यांसारखे दागिने उपलब्ध आहेत. आॅक्साईडमध्ये गोल्डन पॉलिशची यंदा जास्त चालती आहे आणि ही ज्वेलरी आता इण्डो वेस्टर्न गेटअपवर घालणे तरुणी पसंत करु लागल्या आहेत. ३०० रुपयांपासून सुरू होणारी ही ज्वेलरी १२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. भूजचे पारंपारिक दागिने कच्छचे भरतकाम, लोकरीचा वापर आणि त्याला मोती, मिरर, घुंगरु, रंगीबेरंगी गोंडे यांचा साज चढविलेले कच्छचे पारंपरिक दागिने यंदा प्रथमच ठाण्यातील गरबाप्रेमींसाठी आले आहेत. ज्यांच्या त्वचेला आॅक्साईडच्या दागिन्यांचा त्रास होतो, त्या गरबाप्रेमींसाठी हे खास दागिने आहेत. हातपंजा, कडे, पायल, बाजुबंद, पायपंजा, गळ््यातला सेट या प्रकारांत ते उपलब्ध आहेत. या दागिन्यांवर पारंपरिक भरतकाम केले आहे. हे दागिने पारंपरिक गेटअपला खास शोभून दिसतात. हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत ते उपलब्ध आहेत. घागऱ्यात यंदा आकर्षक व्हरायटीज आहेत. सनेडो घागऱ्याला जशी दरवर्षी पसंती असतो, तसे यंदा कली घागऱ्याने तरुणींचे मन जिंकले आहे. याचा घेर खूप मोठा असतो. त्यामुळे गरबाप्रेमी या घागऱ्याला अधिक पसंती देतात. आम्ही २४ मीटरपर्यंत घेर असलेला कली घागरा विकला आहे.- दिप्ती वोरा, ड्रेस विक्रेत्या भूज गावातील हे पारंपरिक दागिने आहेत. अहमदाबादच्या कारागिरांनी हे दागिने तयार केले आहेत. या दागिन्यांवर हातकाम केले असल्याने त्यांची किंमत जास्त आहे. परंतु ते त्वचेला टोचत नाहीत. तसेच घामही शोषून घेतात आणि तुटण्याची भीती नसल्याने यंदा तरुणींनी त्यांची भरपूर खरेदी केली आहे. - कल्पना गाला, दागिने विक्रेत्या