कल्याण : कल्याण-डाेंबिवली महापालिका मुख्यालयात १४ ते २८ जानेवारीदरम्यान साजरा होणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.
महापालिकांचे सर्व कामकाज मराठीतून होणे अपेक्षित आहे. मात्र, आजही निविदा प्रक्रिया आणि निवेदेसाठी कंत्राटदारांसोबत केले जाणारे करार हे इंग्रजीत असतात. त्यामुळे सामान्य मराठी कंत्राटदाराला त्याचे अर्थ बोध होत नाही. नगररचना विभागातील नस्तीवरील टिपण्या या मराठी भाषेत असल्या, तरी इमारत बांधकामाचे बहुतांश प्रस्ताव व त्यासाठीचे कागदपत्रे ही इंग्रजीत असतात. त्याला कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे. कार्यालयीन कामकाजासाठी मराठीचा पूर्णपणे वापर झाला पाहिजे, असा आग्रह धरला जात आहे. किमान भाषा पंधरवड्यात त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मराठी भाषाप्रेमींकडून होत आहे.
मराठी ही कामकाजाची भाषा झाली पाहिजे, तरच ती रोजगाराची भाषा होऊ शकते. त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. आजही जिल्हा सत्र न्यायालयाच्या पातळीवर मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजासाठी केला जात असला, तरी न्याय व्यवस्थेपुढे सादर केले जाणार अपिल, अर्ज हे मराठीऐवजी इंग्रजीत असतात. न्यायालयीन कामकाजातही मराठी पूर्णपणे वापर केला जात नाही, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले.
फोटो : १५ कल्याण-रांगोळी
-------------------------