शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:43 AM

मुंबईची पाणीचिंता मिटणार; धरणकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील बारवी धरणासह मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे या धरणांखालील गावांना ती भरण्याआधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. यात मोडकसागरच्या काठावरील ४२ गावांचा समावेश आहे. पाणीसाठा वाढल्याने मुंबईची चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे.जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी, गावपाड्यांना या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याची पातळी शुक्रवारी ६८ मीटर असून यंदा स्वयंचलित गेट बंद करून ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठवण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच त्यातील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यामुळे पिंपळोली, चांदप, दहागाव, चोन, कोऱ्याचापाडा, तारण, अस्नोली या बारवी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.या धरणात २४ तासांत २१४ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटणपाड हे पाणलोट क्षेत्र मिळून पडलेल्या या पावसाची सरासरी ४८ मिमी नोंद झाली आहे. सध्या त्याची पाणीपातळी ६८ मीटर असून ६३.२८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९९.१८ टक्के होता. आंध्रात काही दिवसांच्या तुलनेत बºययापैकी ७४ मिमी, भातसा ७६ मिमी, तर मोडकसागरमध्ये ८९, तानसात ५० मिमी, मध्य वैतरणात ९० मिमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सरासरी अवघा ३१ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडल्याची नोंद झाली आहे. यापैकी ठाणे परिसरात ३८ मिमी, कल्याणला १५, मुरबाड २५, भिवंडीला ३१, शहापूरला ४६, उल्हासनगर २८ आणि अंबरनाथला २७ मिमी पाऊस पडला आहे.मोडकसागर-तानसाची आजची स्थितीमोडकसागर धरणाची पाणीपातळी शुक्रवारी १२ वाजता १५९.६७ मीटर असून ते भरून वाहण्याची पातळी १६३.१५ मीटर आहे. पाऊस पाहता ते कधीही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे वैतरणा नदीकाठावरील ४२ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यामध्ये दाधारे, जोशीपाडा, कळंबे, शेले, तिळसे, पोपरोली, धिंडेपाडा, अनशेत, गाले, तुसे, सारशी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स, शीळ,अब्जे अलमन, कुतल, बोरंदे, आवंदेध, नाने, गलतरे, हमरापूर ही सर्व २४ गावपाडे वाडा तालुक्यातील आहेत. तर, पालघर तालुक्यातील १८ गावे या वैतरणा नदीकाठावर आहेत. तर, तानसा धरण १२५.९६ मीटर भरले असून ते ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.