कल्याण - कल्याणमध्ये खाडी किनारा परिसरात विविध प्रकारच्या 13क् पक्षांचे वास्तव्य आढळून येते. तसेच काही पक्षी हिवाळ्य़ात परदेशातून आल्याकडे स्थलांतर करतात. ऑक्टोबर हिट सुरु असले तरी काल रविवारी दुपारी पक्षी मित्रंच्या हाती एक वेगळाच पक्षी लागला आहे. तो स्थलांतरीत आहे की, आपल्या देशातील हे स्पष्ट होत नसले तरी प्राथमिक दर्शनी हा पक्षी निळ्य़ा छातीचा सुरवा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षी मित्र महेश बनकर यांना कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोडवरून एक कॉल आला. एका महिनेने त्याना फोन करुन सांगितले की, एक पक्षी पडलेला आहे. बनकर यांनी तात्काळ धाव घेतली. त्याना तेलात माखलेला एक पक्षी मिळून आला. त्यांनी तो त्यांच्या ताब्यात घेतला. घरी आणून त्याना अन्न पाणी दिले. तो तेलात माखला असल्याने तो तेलात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काळा पिसांचा व लांब चोच असलेला हा पक्षी भारतीय आहे की, स्थलांतरीत होऊन आपल्या देशात आला आहे. त्याचे नाव कळू शकलेले नाही. त्याला ओळखता आलेला नाही. त्यामुळे मिळून आलेला पक्षी हा दुर्मिळ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बनकर यांनी पक्षाचा फोटा फेसबूक व सोसल मिडीयावर पाठविला. तेव्हा त्याना एकाने प्रतिसाद देऊन छायाचित्रत दिसत असलेला पक्षी हा निळया छातीचा सुरवा असल्याचे सांगितले आहे.