मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील नाखवा प्रीतम नेतोघर यांच्या यशया ह्या मच्छीमार बोटीला समुद्रात टाकलेल्या मासेमारी जाळ्यात दुर्मिळ कासव अडकले . बुधवारी किनाऱ्या पासून सुमारे ८ ते ९ किमी खोल समुद्रात हे कासव सापडले.
नाखवा व बोटीवरील खलाश्यानी कासव सुखरूप समुद्रात सोडून दिले. काल मंगळवारी देखील उत्तनच्या सहारा ह्या मच्छीमार बोटीच्या जाळ्यात कासव सापडले होते . बोटीचे नाखवा डेव्हिड यांनी ते कासव समुद्रात सुखरूप सोडले .