ठाणे : नवरात्रोत्सवात गरब्याची धूम सुरू झाली असून या दरम्यान लाऊड स्पीकर लावण्यास पोलिसांनी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा ठेवली आहे. मात्र, शासनाने अष्टमी आणि नवमीच्या दिवशी ती रात्री १२ वाजेपर्यंत वाढविल्याने गरबा खेळणाऱ्या तरु ण-तरु णींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दोन दिवशी रात्री पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. गरब्याचा उत्साह पाहता २० आॅक्टोबरला अष्टमी तसेच २१ तारखेला नवमी असल्याने या दोन दिवशी सकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्यास परवानगी दिल्याने या निर्णयाचे नवरात्री मंडळांनीदेखील स्वागत केले आहे.
मंगळवार-बुधवारी रात्री १२ पर्यंत रासगरबा
By admin | Published: October 19, 2015 1:11 AM