ठाणे : ब्रह्मांड कट्टयावर ब्रह्मांड संगीत कट्टा प्रस्तुत अरुण दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली "बार बार देखो" या हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. आओ हजूर तुम को सितारों में ले चलो हे गाणे अंजली आजगावकर यांनी सादर करुन कार्यक्रमाला व रसिक प्रेक्षकांना सुरांच्या दुनियेत घेऊन गेल्याचा आनंद दिला.
ब्रह्मांड संगीत कट्टा म्हणजे ब्रह्मांड कट्टयाने सुरु केलेली गाण्यांची मैफील. ब्रह्मांड कट्टाच्या मुक्त व्यासपीठावर नेहमीच उदयोन्मुख कलाकांरांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते. याच व्यासपीठावरुन गाणी सादर करुन ब्रह्मांड संगीत कट्टा सुरु केला. या गायकांनी आपला पहिला प्रयोग काशीनाथ घाणेकर येथे ३० डिसेंबर २०१९ रोजी मोठ्या दिमाखात सादर केला. त्यानंतर दुसरा हाउसफुल्ल प्रयोग ब्रह्मांड कट्टयावर झाला. कार्यक्रमाची सुरुवात सावन कुमार यांनी चलो बुलावा आया है हे देवीचे गीत सादर करुन केली. मेरे सपनों की राऩी कब आयेगी हे गाणं कुंदन धुरी तर स्नेहा आंदुर्लेकर यांनी तुने ओ रंगीले कैसे जादू किया मंगेश भोईर यांचे गाला वर खळी या गाण्यानी बहार आणली. निलम भोगटे यांचे बाग में कली खिली, पान खाये सैया हमार व जाने कहा मेरा जिगर गयाजी हे गीत मीरा वेलींग यांनी हेमंत मयेकर सोबत गाऊन ज्येष्ठांना खुश केले. निलेश महाडीक यांच्या सामने ये कौन आया दिलमे हुई हालचल आणि चंद्रशेखर शिंदे व शीतल बोपलकर एक में और एक तू दोनो मिले इस तरह तसेच मनिषा ठाणेकर हीने जाने जा ओ मेरी जाने जा हे आशा भोसलेचे गीत सादर करुन रसिकांनी चांगलाच ताल धरायला लावला. द्वंदगीतात अविनाश जाधव व मनीषा ठाणेकरचे तेजाब चित्रपटाचे कह दो के तुम हो मेरी वरना ये गीत उत्तम सादर करुन प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली. पंकज शहा यांचे चला जाता हूं किसी के धुनमे व हेमंत यांचे खयके पान बनारस वाला सुपर हिट ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी चोरीचा मामला या गीतावर उपस्थित जोडप्यांनी मनमुराद नाच केला. या संपूर्ण कार्यक्रमाला सुत्रबध्द केले होते शेरोशायरीचा बादशाहा निवेदक सुशील कुमार चोरगे यांच्या रसाळ व सुमधुर निवेदनाने. प्रत्येक गाण्याचे व गायकाचे अचूक व सुंदर वर्णन व समयोचित शेरोशायरीने मजा आणली. तसेच त्यांने सादर केलेल्या कवीता व शायरी यांना प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण टि. व्ही. सिंगर व संगीतकार गायक शैलेंद्र जाधव व्हाईस ऑफ रफी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्याॆनी शिर्डी वाले साईंबाबा व तुम जो मिल गये हो.. ही दोन गीते सादर करुन मैफीलीत चार चांद लावले व रसिकांच्या मनात घर केले. कार्यक्रमाला ब्रह्मांड कट्टयाच्या पुढाकाऱ्याने संजीव जैन यांच्या तर्फे महाड येथील पांगारी गावकऱ्यांना समाज मंदीर व लहान मुलांच्या भावी कार्यासाठी लेपटॉप प्रदान करण्यात आला.