शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

टीएमटीच्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले

By admin | Published: May 01, 2017 6:17 AM

टीएमटी अर्थात ठाणे परिवहनच्या सेवेत जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्या तरी

ठाणे : टीएमटी अर्थात ठाणे परिवहनच्या सेवेत जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्या तरी जुन्या बस रस्त्यावर धावण्याचे प्रमाण मात्र वेगाने कमी होऊ लागले आहे. परिवहनच्या तफ्यात ३१७ बसपैकी प्रत्यक्षात २०० च्या आसपासरस्त्यावर धावत असून त्यादेखील कमी उत्पन्न देणाऱ्या मार्गावर धावत आहेत. त्यातही आता त्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले असून रोज ४० ते ४५ बस ब्रेकडाऊन होत आहेत. त्यामुळे परिवहनचा पाय आणखी खोलात रूतूतअसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या बसवरच आता परिवहनची आर्थिक नाडी अवलंबून राहणार असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे.ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बसेस असून वागळे आगारातून रोज १७० ते १८० आणि कळवा आगारातून ३० ते ३५ रस्त्यावर धावत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, ज्या दिवसापासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल होण्यास सुरवात झाली आहे, तेव्हांपासून बसेसची संख्या आणखी रोडावली आहे. आजतर रस्त्यावर तुरळक बस धावत असल्याचे चित्र आहे. असे असतांना त्या बंद पडण्याचे प्रमाणही मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजघडीला रोज निघणाऱ्या २०० ते २१० पैकी ४० ते ४५ बस या ब्रेक डाऊन होत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हा गाडा सुधारण्यासाठी परिवहनने आपल्या अंदाजपत्रकात पालिकेकडून कोट्यवधींचे अनुदान मागितले आहे. परंतु, ही सेवाही ठेकेदाराच्या बसेसवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. ठेकेदाराच्या बस वेळेवर निघत असून परिवहनच्या बसचे वेळापत्रक हे आजही कोलमडलेले आहे. घोडबंदरच्या रहिवांशाना ठेकेदाराच्या बसचा फायदा होत असला तरीदेखील शहरातील इतर मार्गांवरील प्रवाशांना परिवहनच्या जुन्या बसचा आधार असल्याने त्यांना आजही बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागवे लागत आहे. त्यात आता ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले असतांना त्यावर किरकोळ मुलामा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान दुसरीकडे बसची संख्या कमी होत असतांना परिवहनचे उत्पन्न मात्र २५ लाखांच्या घरात गेले, ही जमेची बाजू असली तरी यातील अर्धे उत्पन्न हे ठेकेदारांच्याच बसपोटी मिळत असल्याचे सूत्र सांगतात. (प्रतिनिधी)परिवहनची आर्थिक नाडी ठेकेदाराकडे?ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बसेस असून वागळे आगारातून रोज १७० ते १८० आणि कळवा आगारातून ३० ते ३५ रस्त्यावर धावत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, ज्या दिवसापासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल होण्यास सुरवात झाली आहे, तेव्हांपासून बसेसची संख्या आणखी रोडावली आहे. येत्या काळात परिवहनची आर्थिक नाडीदेखील ठेकेदाराकडे जाणार असल्याचेच चित्र यातून पुढे आले आहे.