ठाणे : वंचितांचा रंगमंचावर गाजलेल्या नाट्यकृतींचे व्हिडीओ शुटिंग आणि त्यासोबत या रंगभूमीवर चमकणारे कलाकार प्राप्त परिस्थितीशी दोन हात करता करता आपले अनुभव किती कसदाररित्या नाटिकेतून अभिव्यक्त करतात ही कहाणी या व्हिडिओ मध्ये सामावण्याचा प्रयत्न करून ते यु ट्युबद्वारे जगभर प्रदर्शित करण्याची घोषणा ज्येष्ठ साहित्यिक आणि नाट्य जल्लोषचे प्रणेते रत्नाकर मतकरी यांनी ठाण्यात केली.नाट्यजल्लोष पाचव्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल रविवारी मो. ह. विद्यालय येथे आयोजित कार्यकर्ते-कलाकार उपस्थित होते. रंगमंचीय कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने त्यांच्यात अधिक वैचारिक स्पष्टता, शिस्त, नेमकेपणा आदी गुण विकसित व्हावेत आणि एका अधिक व्यापक अर्थाने या मंडळींनी हौशीरित्या काम न करता अधिक व्यावसायिकता अंगीकारावी यासाठी या कलाकार कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अधिक आखीवपणे आणि काटेकोर पद्धतीने होण्याच्या दिशेने प्रयास सुरू करावे, असे ते म्हणाले.पाचव्या वर्षी हा उपक्र म अन्य महानगरात किंवा तालुका-जिल्हा स्तरावर होऊ शकेल का, याची चाचपणी सुरू करावी. समता विचार प्रसारक संस्थेने आता याबाबत जी समज आणि जे प्राविण्य मिळवले आहे ते लक्षात घेता अन्यत्र हा उपक्र म नेत असतांना बाल नाट्य संस्थेसोबत समता विचार प्रसारक संस्था आणि स्थानिक जबाबदारी स्वीकारणारी संस्था अशा संयुक्त विद्यमाने हे उपक्र म राबविण्यात यावेत. त्यात महाराष्ट्रातील अन्य समविचारी मान्यवरांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आता सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ म्हणाले कि, एकीकडे प्रत्यक्ष नाट्य जल्लोष सादरीकरणाची केंद्रे वाढवीत नेणे तर दुसरीकडे या रंगमंचावर गाजलेल्या नाट्यकृती विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून देश दुनियेपर्यंत पोहोचिवणे अशी दुहेरी योजना यातून आकारास येणार आहे.
वंचितांचा रंगमंच वैश्विक स्तरावर नेणार- रत्नाकर मतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:52 AM