मध्य रेल्वेवरील आंबिवली ते टिटवाळा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांजवळ असलेल्या गवताला आग लागून त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या. त्यामुळे सिग्नल यंत्रणा ठप्प होऊन त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने या मार्गावरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आंबिवली ते टिटवाळा या स्थानकांदरम्यान, गवताला आग लागून, त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्सही सापडल्या. तसेच केबल्स जळाल्याने सिग्नल यंत्रणा बंद होऊन वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, रेल्वे वाहतूक उशिराने होत असल्याने शहाड स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सध्या रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.