भिवंडी : शहरातील नामांकीत पस्तीस वर्षीय शरीरसौष्ठवपटू रवी सावंत यांचा आज मंगळवार रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाच दिवसांपुर्वी शहरातील शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने आपल्या कसरतीचे कौशल्य दाखवित ‘भिवंडी श्री’ किताब पटकाविला होता.मागील महिन्यात ६ जानेवारी रोजी उरण येथे महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत तिसऱ्या गटात रवी सावंत याने सुवर्ण पदक पटकावून त्यांची ‘भारत श्री’ साठी निवड झाली होती. पाच दिवसांपूर्वीच भिवंडी शहरात पार पडलेल्या स्पर्धेत त्याने ‘भिवंडी श्री’ किताब पटकावला होता . त्यांच्या अचानक मृत्युने शहर व परिसरांतील शरीरसौष्ठवपटू खेळाडूंमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रवी सावंत शहरातील कामतघर भागात ापल्या कुटूंबासह रहात होता. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा,आई व वडील असा परिवार आहे . रवी सावंत याने मुंबई ,ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात अनेक स्पर्धा जिंकून आपले नाव झळकावले होते. आज सायंकाळी त्यांच्यावर ताडाळी येथील स्मशानभूमीत साश्रू नयनाने अंत्यसंस्कार करण्यात आले . या दु:खद प्रसंगी आमदार रूपेश म्हात्रे, महेश चौघुले, भाजपा गटनेता निलेश चौधरी, माजी महापौर तुषार चौधरी, नगरसेवक हनुमान चौधरी, माजी नगरसेवक कमलाकर पाटील, साईनाथ पवार, आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने त्याचा चाहता वर्ग उपस्थित होता. सध्या युवकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु होण्याच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने तरु णांमध्ये चिंतेचे वातवरण पसरले आहे.
भिवंडीत शरीरसौष्ठवपटू रवी सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:19 PM
भिवंडी : शहरातील नामांकीत पस्तीस वर्षीय शरीरसौष्ठवपटू रवी सावंत यांचा आज मंगळवार रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या ...
ठळक मुद्दे‘भिवंडी श्री’ किताबपटू रवी सावंत यांचा मृत्यूउरण येथे सुवर्ण पदक पटकावून ‘भारत श्री’ साठी निवडयुवकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची वाढ