ठाणे : वाचन संस्कृती जगावी आणि वाचनाचे महत्व वाढावे या उद्देशाने ठाण्याच्या अभिनय कट्टा येथे किरण नाकती यांच्या संकल्पनेतून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी "वाचन कट्ट्याचे" आयोजन केले जाते. वाचक कट्टा व कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्ती,कॉलेज कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने जागर अभिवाचनाचा या कार्यक्रमाअंतर्गत वाचन कट्ट्यावर तीन लघुनाटीकांचे अभिवाचन करण्यात आले.
लेखक विश्वास पाटील लिखित महानायक कादंबरीवर आधारित "आझादीचा महायज्ञ" याचे नाट्यरूपांतर प्रा.दीपा ठाणेकर यांनी केले होते याचे वाचन सागर माने , विघ्नेश बने , शलोक शुरुषे , फातिमा खान , आरती काकडे , श्रद्धा निर्भवणे ,शुभांगी वीरकर , सोनिया जाधव यांनी पार्श्वसंगीतासह सादर केले . लेखक गंगाधर गाडगीळ यांची "बंडू चहा घेतो" हि नाटिका प्रतीक टाकले व विद्या पाटील यांनी सादर केली .आजचा तरुण वर्ग संमेलनाकडे पाठ फिरवत आहे,त्यावर आधारित "तरुणाईचे असंमेलन" हि लघु नाटिका वाचन स्वरूपात गुरु शिरोडकर , शुभम शिंदे , श्वेता जाधव , काजल शिंदे, प्रतीक टकले ,अजिंक्य आव्हाड या सादर केली. तसेच या वेळी अभिनय कट्ट्याचे बालकलाकार निमिष पिंपरकर , अद्वैत मापगांवकर , अर्णव पवार ,सान्वी भोसले , प्रथम नाईक तसेच कुंदन भोसले , वैभव चव्हाण , न्यूतन लंके , संदीप लबडे या कलाकारांनी वेगवेगळया विषयांवर अभिवाचन सादर केले.या प्रसंगी ठाण्यातील साहित्यिक,लेखक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपास्थित होते.आजच्या तरुण पिढीला वाचन करणे खूप गरजेचे आहे.वाचनाला अनन्य साधारण महत्व आहे,वाचन संस्कृती समाजातील सर्वच स्तरात रुजू व्हावी या उद्देशाने आम्ही वाचक कट्टा हा उपक्रम सुरू केला आहे तसेच ज्याला कुणालाही कोणत्याही प्रकारचे साहित्य म्हणजेच कथा , एकांकिका , नाटक , कविता , प्रवासवर्णन याचे वाचन करण्याची इच्छा असेल त्यांनी अभिनय कट्टयावर सुरु असलेल्या वाचक कट्टयावर आपले वाचन सादर करावे असे आवाहन किरण नाकती यांनी केले. यावेळी निवेदन राजश्री गढिकर तर दीपप्रज्वलन प्रा. दीपा ठाणेकर यांनी केले.