शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

जगण्याला प्रेरणा देते ते वाचन, जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 3:04 PM

जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. 

ठळक मुद्देजगण्याला प्रेरणा देते ते वाचनजवाहर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन  जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ठाणे : ‘वेद आणि संत साहित्य ही भारतीय तत्त्वज्ञानाची, संस्कृतीची परंपरा आहे. गुरु-शिष्य परंपरा आणि मौखिक साहित्यातून हजारो वर्षांपासून ही परंपरा रुजली आहे. त्यातून वाचनसंस्कृतीचा विकास झाला. हे वाचनच जगण्याला प्रेरणा देणारे ठरले आहे,’ असे विचार कळवा येथील जवाहर वाचनालयाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.              या कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, समीक्षक अरविन्द दोडे अध्यक्षस्थानी होते तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय युवाशक्तीच्या प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ठाणे भूषण ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. शाहू रसाळ, कवी बाळ कांदळकर, साहित्यिक रामदास खरे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी युवा कवयित्री जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ या ठाण्यातील सिद्धी फ्रेण्ड्स पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे सचिव सुशांत दोडके व कार्यकारिणी सदस्या आशा मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर निशिकांत महांकाळ यांनी कार्यक्रमाचे आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना दोडे यांनी संत वाङ्मय, पाठांतर, संस्कारांचे महत्त्व, कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे कार्य, इंग्रजी भाषेतील साहित्याचा मराठीतील अनुवाद, वाचनाची आवड आपले विचार कसे समृद्ध करते आदी विविध विषयांवर भाष्य केले. प्रा. दीपा ठाणेकर यांनी युवाशक्तीच्या वाचन प्रेरणांविषयी मते मांडली. ‘वाचनाकडे दुर्लक्ष करणाऱया मुलांना दोष न देता त्यांच्या पालकांनी पुस्तकांची आवड निर्माण करायला पाहिजे, मराठी भाषा-साहित्य-संस्कृती यांसाठी उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहिजे, युवापिढी ज्या समाजमाध्यमांवर लिहिती झाली आहे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, मनोरंजन आणि बौद्धिक भूक भागविण्यासाठी वाचन किती महत्त्वाचे झाले आहे, याचा विचार झाला पाहिजे,’ आदी मुद्दे त्यांनी मांडले. डॉ. शाहू रसाळ यांनी जुई प्रधान यांच्या काव्यसंग्रहाचे निरुपण करताना कवयित्रीला शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी ‘अलवार’ काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. जुई प्रधान यांनी आपल्या कवितांमागील भूमिका विशद करताना मनोगत व्यक्त केले. यावेळी साहित्यिक चांगदेव काळे, कवयित्री वैदेही केवटे, रंगकर्मी आदित्य संभुस, कवी-गीतकार राजेंद्र ठाकुर, अॅड. रुपेश पवार, राजेंद्र गोसावी, प्रतिक्षा बोर्डे, आणि विनोद पितळे आदी रसिक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईliteratureसाहित्य