शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रेडी रेकनरचा दिलासा, पण टीडीआर धोरणही हवे

By admin | Published: April 04, 2016 2:00 AM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या रेडी रेकनर दरात फारशी वाढ नसल्याचा ठाणे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळेल आणि या क्षेत्रातील मंदीवर हा माफक उतारा ठरेल

कल्याण : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या रेडी रेकनर दरात फारशी वाढ नसल्याचा ठाणे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळेल आणि या क्षेत्रातील मंदीवर हा माफक उतारा ठरेल, अशी भावना बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, राज्य सरकारचे नवे टीडीआर धोरण लवकर अमलात यायला हवे. अनधिकृत-धोकादायक इमारतींना दिलेल्या दिलाशाच्या घोषणा लवकरच प्रत्यक्षात याव्या, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी १० ते १५ टक्के रेडी रेकनरचे दर राज्य सरकार वाढवते. यंदा मात्र सरासरी सात टक्के वाढ आहे. गृहबांधणी क्षेत्रातील मंदी पाहता राज्य सरकारने हे दर तीन महिने उशिरा वाढवले आहेत. कोकण विभागीय आणि एमएमआर रिजनसाठी करण्यात आलेली ही वाढ मर्यादित आहे. त्यामुळे त्याचे बिल्डरांनी स्वागतच केल्याची माहिती ‘एमसीएचआय’च्या कार्यकारी मंडळातील सदस्य राजू जाधव यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीत हा दर पाच टक्के वाढला आहे. मुळात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात घनकचरा प्रकल्पांच्या दिरंगाईमुळे उच्च न्यायालयाने नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीतील बिल्डरांचे नवे प्रकल्प मंजूर झालेले नाहीत. तेथील बिल्डर आधीच अडचणीत आले आहे. त्यातच रेडी रेकनरची दरवाढ १० ते १५ टक्के झाली असती तर त्याचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला असता. कोकण विभागातील पाच जिल्हे ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी यांच्यासह एमएमआरडीएच्या मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रेडी रेकनरचा दर फारसा वाढलेला नाही. त्यामुळे घर खरेदी केल्यावर ग्राहकाला स्टॅम्प ड्युटीही कमी भरावी लागेल. राज्य सरकारने नुकतेच टीडीआरचे नवे धोरण जाहीर केले आहे. पण, त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून होत नाही. ती झाल्यास घरे स्वस्त होऊ शकतात. बांधकाम क्षेत्रातील मंदी कमी होण्यास त्यामुळे थोडीफार मदत होईल, असे बिल्डरांचे म्हणणे आहे. डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक राहुल दामले यांनी सांगितले, भाजपा सरकारने बांधकाम क्षेत्रातील मंदीचे भान ठेवून दरवर्षीप्रमाणे रेडी रेकनरचे दर लागू न करता त्यात मर्यादित स्वरूपात दरवाढ केली आहे. तसेच वेगवेगळ्या शहरांची वेगवेगळी पार्श्वभूमी लक्षात घेता तेथील वाढही वेगवेगळी आहे. घरबांंधणी आणि जमीन विक्री क्षेत्रात मंदी सुरू आहे. रेडी रेकनरचा दर कमी झाला असला तरी घरे फार स्वस्त होणार नाहीत. प्रतिचौरस फुटामागे ५०० रुपयांनी दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेडी रेकनरचे दर वाढले नसले, तरी बांधकाम क्षेत्रातील मंदी कमी होईल, असे नाही. आधीच महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांवर न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात अशीही मंदीच आहे.