कसारा : कोसळणारा मुसळधार पाऊस, निसरड्या वाटा, हजार फूट खोल दरी, दरीत उतरताना वरून अंगावर पडणारे दगड, पाय सरकला तर आपल्याच जीवाची खैर नाही अशी स्थिती... पण यातील कशाचीही तमा न बाळगता अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणाºया या रिअल लाइफ हिरोंमुळे सोमवारी संध्याकाळी उंटदरीत कोसळलेल्या गाडीतील चौघांचे प्राण वाचले.सोमवारी संध्याकाळी संध्याकाळी सोडेपाच-सहाच्या दरम्यान घाटणदेवी मंदिरासमोर गाडी रिव्हर्स घेताना ती अचानक उंटदरीत थेट हजार फूट खोल कोसळली. या गाडीतील हरिष कटकिया, गीता कटकिया, रुद्र कटकिया, वैष्णवी कटकिया आणि अदिती कटकिया हे कुटुंबाच्या आक्रोशासह ती घाडी खाली गेली. जखमी अवस्थेत खोल दरीत कोसळलेले हे कुटंब मदतीची वाट पाहात होते.दरीत गाडी कोसळल्याचे समजताच महामार्गावर गस्त घालणारे पिंक इन्फ्रा कंपनीचे गस्ती पथक आणि समाजसेवक घटनास्थळी दाखल झाले. या गस्त पथकातील रवींद्र देहाडे, वसीम शेख, देवेंद्र येडेकर, प्रथमेश पुरोहित, नाना बोºहाडे, नीलेश भारे, विजय कुंडकर, श्रीकांत काळे, समीर शेख, सलमान शेख, अफरोज खान, दीपक उघडे, फिरोज पवार, नाना शिरोळे, आशिष साहू, जाकीर शेख, डॉ. नितिन चालसे, उदय जाधव, किशोर भडांगे, अझीर शेख, रवींद्र दुर्गाडे, महेंद्र कंपनीचे सुरक्षारक्षक तातडीने दोरखंडाच्या सहाय्याने हजार फूट खोल दरीत उतरले आणि एकेका जखमीला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. जखमींना सोबत घेऊन दरीचा भाग चढतांना काचा, काटे, दगड, निसरड्या वाटांचे अडथळे तर होतेच; पण कोसळणारा पाऊस आणि वारा यांचाही त्रास होता. पण मागे न हटता चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कुटुंबातील चौघांना वाचवण्यात त्यांना यश आले.
जीवावर उदार होत वाचवले चौघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:14 AM