- पंकज रोडेकरई-चलन प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना आता त्यांच्या मोबाइलवर दंडाची पावती पाठवली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवादई -चलन प्रणालीत काही त्रुटी आहे का?ई- चलन प्रणाली ही सद्यस्थितीत पाच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक-मालकांमध्ये होणारे वादविवादाचे प्रकार कमी झाले आहे. त्यातच, महसूल गोळा करण्याचे काम हे वाहतूक पोलिसांचे मूळातच नाही. यामुळे आता वाद न घालता, फक्त फोटो क्लिक करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात आहे. या प्रणाली कितीवेळा नियम मोडला आहे. किती शिलकी दंड आहे. हे तातडीने समजते. त्यातून ठाणे पोलिसांनी वारंवार नियम मोडणाºया एकाकडून ५० हजारांचा दंड आकारला आहे. त्यातच ही प्रणाली योग्य असून सध्या कोणतीही सुधारणा करायची गरज आहे असे वाटत नाही. तर एखाद्या वाहतुकीच्या नियमाची दुरुस्ती किंवा वाढ करता येई शकते.बनावट नंबरप्लेटचा वापर करण्याचेप्रकार वाढले आहेत का?कारवाईवेळी बनावट नंबरप्लेट असल्याचे समजत नाही. मात्र, ते निदर्शनास आल्यावर त्यासंदर्भात रिपोर्ट ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला जातो. त्या विभागाकडून नंबरप्लेटची तपासणी होते. त्यानंतर संबंधित विभागाकडून कारवाई होऊ शकते. तसेच त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन तक्रार पोलीस ठाण्यात करायची आहे. त्यानुसार गुन्हे दाखल होतील.वाहनचालक, मालकांना काय आवाहन कराल?ेवाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतन पालन केल्यास दंड होणारच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या जो तो गाईघडबडीत सर्रास वाहतूक नियम पायदळी तुडवताना दिसतो. नियमांचे पालन करावे, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते.नियम न मोडता येणारी दंडाची पावती भरायची का?नियम न मोडता ही या प्रणालीद्वारे दंडाची पावती शक्यतोकोणाला पाठवली जात नाही. पण तुरळक प्रमाणात हे प्रकार समोर येत आहेत. अशा तक्रारी आल्यावर त्या चालकाला दंड न भरता त्याच्या आलेल्या तक्रारीची पहिली तपासणी के ली जाते. त्यात तो दोषी नसल्यासचे आढळून आल्यावर त्याच्याकडून दंड न घेता ती दंडाची पावती रद्द केली जाते. काही तुरळक प्रकारात बनावट नंबरप्लेट लावण्याचे प्रकार दिसत आहेत.दोषी नसलेल्या वाहनचालकाला पाठवलेली दंडाची पावती रद्द होते.तो रद्द करण्याचा तेवढा अधिकार आम्हाला आहे. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
चुकीच्या दंडाची पावती होते रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 1:00 AM