कल्याण-कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यामुळे पादचारी व रेल्वे प्रवाशांना मार्गक्रमण करणो गैरसोयीचे होत आहे. या प्रकरणी मनसेच्या पदाधिका-यांनी आज आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन फेरीवाल्यांना स्टेशन परिसरातून हटविण्याची मागणी केली.
मनसेचे नेते राजू पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी आमदार प्रकाश भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते प्रकाश भोईर, पदाधिकारी हर्षद पाटील, राहूल कामत आदींनी आयुक्त वेलरासू यांची भेट घेतली. एल्फीस्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर झालेल्या दुर्घटनेपश्चात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई नगरातील सर्व रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटविले नाही तर मनसे आंदोलन करणार असा इशारा देत मुंबईत भव्य मोर्चा काढला होता.
त्यानंतर स्टेशन परीसरातील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरु होती. फेरीवाल्यांना चांगलाच चेप बसला होता. मनसेच्या आंदोलनाची दखल स्थानिक स्वराज्य संस्था, रेल्वे प्रशासन व पोलिसांना घ्यावी लागली होती. ठाणो येथे पार पडलेल्या ठाकरे यांच्या जाहिर सभेत फेरीवाल्यांच्या कारवाईचा पुनर्उच्चर ठाकरे यांनी केला होता. दरम्यान त्यांनी मागच्या महिन्यात आयुक्त वेलरासू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन फेरीवाले हटविण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाशी आमचे बोलणो सुरु असून कारवाई सुरु असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई थंडावली आहे.
रेल्वे पादचारी पूलावर व स्टेशन परिसरात काही प्रमाणात फेरीवाले पुन्हा बसू लागले आहे. कारवाईची पकड ढिल्ली झाल्याने मनसेचे पदाधिका:यांनी आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई थंड का झाली आहे असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी येत्या मंगळवारी पोलिस प्रशासनासोबत फेरीवाला कारवाई संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर काय कारवाई केली जाईल हे सांगून असे आयुक्तांनी मनसे पदाधिका-यांना सांगितले.
मनसे मंगळवारपर्यंत धीर धरण्याची तयारी ठेवली आहे. मंगळवारी आयुक्तांकडून काय सांगितले जाते. त्यानंतर मनसे आंदोलन करणार हे मात्र निश्चीत असल्याचे पदाधिका:यांनी सांगितले. हे आंदोलन खळखट्टय़ाकचेच असणार आहे. आयुक्तांनी दिलेली मंगळवारची डेडलाईन व मनसेही मंगळवार्पयतच वाट पाहिली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे.
फेरीवाला प्रकरणी मनसेकडून प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. स्टेशन परिसरात विशिष्ट अंतर सोडले तर त्याच्या आत फेरीवाला नसावा. हा न्यायालयाचा आदेश आहे. या आदेशाची अवमानना महापालिका व रेल्वे प्रशासनाकडूनच केली जात आहे. न्यायालयाच्या अवमानतेप्रकरणी ही याचिकाही मंगळवारनंतरच दाखल करण्यात येईल असे मनसेकडून सांगण्यत आले आहे.