कल्याण : शहाड येथील कब्रस्तानमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून बेकायदा नळजोडणी घेतली होती. ती तोडल्याने ‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन कब्रस्तानची नळजोडणी पुन्हा जोडून देण्यात आली आहे.
मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांना एका मित्राने फोन करून हा प्रकार सांगितला. शहाड कब्रस्तानमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन केले जातात. त्यासाठी खड्डा खोदला जातो. दफन केल्यावर त्यावर पाणी मारले जाते. उल्हासनगर महापालिकेने त्या ठिकाणी नळाची सोय केलेली नाही; त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून नळजोडणी घेण्यात आली होती. बेकायदा नळजोडणीचे निकम यांनी समर्थन केले नाही. मात्र हद्दीचा वाद पाहता कब्रस्तानसाठी नळजोडणी आवश्यक असल्याची बाब निकम यांनी दोन्ही महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेही हा विषय मांडला. खासदारांनी दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. उल्हासनगर महापालिका त्या ठिकाणी नळजोडणीची व्यवस्था करणार आहे. तोपर्यंत कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मान्य केले आहे.
-----------------------------