लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शहरातील ४५८ हॉटेल्स, लाँज, बार व तत्सम ऐषोआरामी सुविधा पुरविणाºया आस्थापनांचा ठाणेकºयांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही अवघ्या काही तासांतच अग्निसुरक्षेच्या दाखल्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ महापालिकेने दिली आहे. तसेच, या मुदतवाढीत दुर्घटना घडून जिवीत अथवा वित्तहानी झाल्यास याला सर्वस्वी आयुक्त जबाबदारी असतील त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून त्यांनी सर्वसामान्य ठाणेकरांचे हित जपावे अशी मागणी मनविसेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील दुर्दैवी दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्यानंतर तेथील प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर सर्वच ठिकाणच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला ठाणे महापालिकेनेही काही महत्त्वाची पाऊले उचलल्याचे दिसत असुन मनपा आयुक्त म्हणून त्यांनी कारवाईचा आव देखील आणल्याचे वाचनात आले असा आरोप मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनेआधी मनसेच्या तेथील पदाधिकाºयांनी प्रशासनाला सुचिवले होते. त्याचप्रमाणे ठाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आयुक्तांनी याचा गांभीर्याने विचार करावा व निर्भीडपणे संबंधितांवर कठोर कारवाई करावी. मुंबईच्या आयुक्तांना राजकीय नेत्यांकडून दबाव येत आहे असे त्यांनी सांगितले तसा दबाव ठाण्यातून आयुक्तांवर आला की काय ज्यामुळे डॅशिंग, आक्र मक प्रतिमा असलेले आमचे आयुक्त नरमले, रिक्षाचालकांची अवैध पार्किंग करणारºयांची कॉलर पकडण्याची हिंमत दाखवलीत तशीच धनदांगडयांविरूध्द कारवाई करताना दाखवावीत हि अपेक्षा. सर्वसामान्य ठाणेकरांना तुम्हाला माघार घेताना पहाण्याची सवय नाही असा टोलाही पाचंगे यांनी हाणला आहे. ठाणे शहराच्या प्रथम नागरिक (महापौर) तुम्हाला हुक्का पार्लरवर तसेच अनधिकृत हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही आपण कोणाच्या दबावाने कारवाई करण्याचे थांबविले आहे. येत्या १५ दिवसांत कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याचे पालकत्व पालकमंत्री स्वीकारतील का? असा सवाल करीत अग्निशमन दलाचा ज्यांच्याकडे दाखला नाही अशा हॉटेल व्यावसायिकांना जोपर्यंत नाहरकत दाखला मिळत नाही तोपर्यंत फक्त पदार्थ शिजवून पार्सल देण्याची मुभा द्यावी असे मनविसेने सुचित केले आहे. मुंबईतील दुर्घटनेच्या हुक्का हेच मुख्य कारण होते. हुक्का पार्लर मुळे कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत आहेत. आपण ८ दिवसांत सर्व हुक्का पार्लर वर बंदी आणावी अन्यथा महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना हुक्का पार्लर विरोधात मनसे पध्दतीने तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा पाचंगे यांनी दिला आहे. हुक्का पार्लर व मनसे कार्यकर्ते यांच्यात होणाºया संघर्षास सर्वतोपरी आपण जबाबदार असाल असेही ते आपल्या निवेदनात शेवटी म्हणाले आहेत. यावेळी किरण पाटील, प्रमोद पत्ताडे, संदिप चव्हाण, प्रसाद होडे, पंकज कोळसकर, संदीप शेळके उपस्थित होते.