शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आधारकार्डसाठी केंद्रावर विनापावती होते वसुली, तहसीलदाराकडे तक्रार : घेतलेले पैसे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 3:03 AM

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे.

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असून त्याची पावती मात्र दिली जात नाही, याची तक्रार विटावा येथील नागरिकाने केल्यावर त्याचे ३० रुपये मात्र परत केल्याचे आढळले आहे.आधारकार्ड काढणे, जुन्या कार्डमधील नावात, पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर संबंधित कंपनीला आधारकार्ड केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. केंद्रावर येथील एनआयसी विभागाचे मॉनिटरिंग असल्याचे चौकशीअंती कळाले. नागरिकांच्या सोयीसाठी या केंद्रावरून विनामूल्य आधारकार्डसंबंधी सेवा होणे अपेक्षित आहे. परंतु, कामानुसार पैसे घेतले जात असून त्याची पावती दिली जात नाही, याशिवाय केलेल्या कार्डच्या दुरुस्तीचे प्रिंटही दिले जात नसल्याची तक्रार विटावा येथील नागरिक नामदेव वाघ यांनी तहसीलदार घारे यांना केली.या तोंडी तक्रारीस अनुसरून पावती देणे अपेक्षित असल्याचे घारे यांनी सांगितले. त्यानंतर, त्यांनी एनआयसीमधील आयटीच्या एका कर्मचाºयास वाघ यांना भेटायला सांगितले. संबंधित कर्मचाºयाची वाघ यांनी आधारकार्ड केंद्रात बराच वेळ प्रतीक्षा केली. त्यानंतर घेतलेले ३० रुपये परत केल्याचे वाघ यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले.