शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

By admin | Published: April 12, 2016 1:04 AM

ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत.

ठाणे : ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर भागातील आझादनगर येथे असलेल्या चार विहिरींचे पाणी आता इतर कामांसाठी वापरात आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि खाजगी कंपनीने पाऊल उचलली आहेत. अशा प्रकारे विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचा पहिला प्रयोग या निमित्ताने हाती घेण्यात आला आहे.सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तर गळतीचे प्रमाण हे ४५ टक्यांच्या आसपास आहे. परंतु, धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ विहिरी वापरात आहेत. तर २१६ विहिरी वापरात नाहीत. तर पालिकेने आता शहरातील विहिरींची सफाईची मोहीम हाती घेतली असली तरी ती अद्याप सुरु झालेली नाही. परंतु, घोडबंदर भागातील प्रभाग क्र. २ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींचे पाणी इतर वापरासाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी अर्पण फाऊडेंशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी बायर इंडिया कंपनीच्या मदतीने आता या चारही विहिरी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. याचा शुभारंभ मंगळवारी होणार असून या चारही विहिरीत हात पोहचेल येथपर्यंत पाणी आहे. त्यानुसार आता त्यांची सफाई करुन त्यावर पाच हजार लिटरच्या आरसीसी स्वरुपाच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत. या टाक्यांतून येथील चारही सार्वजनिक शौचालयांना २४ तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक टाकीच्या ठिकाणी चार नळ बसविण्यात येणार आहेत. नालेसफाईच्या कामात जेसीबीची जलवाहिनीला धक्काठाणे महानगरपालिकेने वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. परंतु, ते करीत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे या परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आधीच टंचाईने त्रस असलेल्या या भागाला पाण्याच्या झळा सहन कराव्या लागल्या.पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरवात करावी, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिकेकडे केली होती. पालिकेने त्यांच्या मागणीची दखल घेऊन वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, ते सुरू असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील परिसराला पाणीपुरवठा करणारी ६ इंची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे वर्तकनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.