शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पुनर्विकासाचा आराखडा तयार

By admin | Published: May 02, 2017 2:22 AM

युती सरकारने मुंबईमध्ये क्लस्टर योजना यशस्वी केल्याचा दावा करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाचा

भार्इंदर : युती सरकारने मुंबईमध्ये क्लस्टर योजना यशस्वी केल्याचा दावा करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाचा आराखडा तयार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी रविवारी दिली. या योजनेत मीरा-भार्इंदरसह उल्हासनगर, भिवंडी आदी शहरांचा समावेश करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. मीरा-भार्इंदर पालिकेने सेंट्रल पार्क येथे आयोजित केलेल्या नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. युती सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असल्यानेच चांगली कामे होत असल्याचा दावा मेहता यांनी केला. २०१५ मध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे शहराला ७५ दशलक्ष लीटर जादा पाणीपुरवठा केला जात असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. ही योजना पालिकेने मुदतीपूर्वी पूर्ण केल्याने त्यातील २५ दशलक्ष लीटर पाणी तातडीने दिल्याचे त्यांनी सांगितले. मीरा-भार्इंदरला सूर्या धरणातील २१८ दशलक्ष लीटर पाणी  मिळण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी राज्य सरकारने १९०० कोटींचा निधी उपलब्ध दिला आहे. यामुळे येत्या अडीच वर्षांत मीरा भार्इंदरचा पाणीप्रश्न सुटेल आणि पुढची २५ वर्षे २४ तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. पाण्याच्या कोट्यात वाढ होत नसली तरी लोकसंख्येत मात्र वाढ होत असल्याने लोकांची तहान भागविण्यासाठी नवीन धरणे बांधण्याचा राज्य सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी प्रास्तविकात नवीन नळजोडणी केवळ आॅनलाईन पद्धतीनेच दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्यासाठी दलाल व मध्यस्थांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. २५ दशलक्ष लीटर पाण्यापैकी रविवारी २३ दशलक्ष लीटर पाणी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते आॅनलाईन प्रक्रियेतील अर्जाची प्रत संगणकावरुन काढण्यात आली. आॅनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ झाल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आणि शहरातील सहा लाभार्थी गृहसंकुलांना अर्जांच्या प्रतिकृतीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान महापौर गीता जैन यांनी नागरिकांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन केले. त्याच्या पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे शहराला ७५ ऐवजी १०० दशलक्ष लीटर जादा पाणी देण्याची मागणी केली. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. संजय राऊत, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, आ. नरेंद्र मेहता यांची भाषणेही झाली. याप्रसंगी आ. रवींद्र फाटक, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे, पालिकेचे शहर उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, डॉ. संभाजी पानपट्टे, दीपक पुजारी, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, दीपक खांबित आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)अधिकारी सुटाबुटात कार्यक्रमात शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा, तर नागरिकांची उपस्थिती बेताची होती. तसेच आयुक्तांनी पालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यक्रमाला हजर राहणे बंधनकारक केल्याने सर्वांनी आपण हजर राहिल्याची नोंद हजेरी पुस्तकात केली. तसेच कार्यक्रमाला सुट घालण्याची सुचना आयुक्तांनी केल्याने बहुतांशी अधिकारी व कर्मचारी सुटाबुटात हजर होते.