लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ५२७ पैकी ३७८ महिलांच्या तक्रारींचे निवारण शनिवारी एका दिवसात करण्यात आले. ठाणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ मार्फत सामाजिक संस्थांच्या मदतीने पोलिसांनी महिलांच्या तक्रारींचे निवारण केल्याने समाधान व्यक्त होत आहे.महिलांसंबंधि दाखल होणारे कौटूंबिक हिंसाचार तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयात पोलीस ठाण्याच्या पातळीवर काय दखल घेण्यात आली. संबंधित आरोपीकडून महिलांना कोणत्या प्रकारे त्रास होऊ नये या पार्श्वभूमीवर ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासगनर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या ‘भरोसा’ विभागामार्फत शनिवारी महिला तक्र ार निवारण दिनाचे आयोजन केले होते. या उपक्र मात ५२७ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ३७८ तक्र ारींचे निवारण केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये सामाजिक संस्था, महिला पोलीस अधिकारी तसेच स्थानिक स्वयंसेवा संस्था यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी महिला तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांना होणारा शारीरिक मानसिक छळ, लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच कौटुंबिक छळ आदींबाबत गुन्हा दाखल असेल तर आरोपींकडून काही त्रास आहे का? तसेच आधी दाखल असलेल्या गुन्हयात योग्य निराकरण झाले का? आदींचा मागोवा घेण्यात आला. यातील ३७८ तक्रारींमध्ये या महिलांना योग्य मार्गदर्शन तसेच समुपदेशन करून तक्र ारींचे निराकरण करण्यात आले. तर उर्वरीत तक्र ारींची कायदेशीर बाबींनुसार पुर्तता करून निराकरण करण्यात येणार महिला तक्रारदार यांना आश्वासित करण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वच ठिकाणच्या महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
ठाणे आयुक्तालयात ५२७ पैकी ३७८ महिलांच्या तक्रारींचे एका दिवसात निवारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:40 PM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ५२७ पैकी ३७८ महिलांच्या तक्रारींचे निवारण शनिवारी एका दिवसात करण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वच ठिकाणच्या महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
ठळक मुद्दे पोलिसांनी महिलांना दिला ‘भरोसा’पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार उपक्रम