डोंबिवली : वाहतूककोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने शाळेच्या तासिकांमधील पाच मिनिटे तर, मधली सुटीतील १५ मिनिटे कमी करण्याचा निर्णय विद्यानिकेतन शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासंदर्भात पालकांना गुरुवारी शाळेच्या अॅपवर सूचित करण्यात आले आहे.
विशेषत: पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. कल्याण आणि शीळच्या दिशेने रिव्हरवूड पार्कला सायंकाळी जाणाऱ्या बस कोंडीत अडकतात. इयत्ता नववी-दहावी आणि ज्युनिअर, सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना दुपारी ३ नंतर सोडायला जाणाºया बस परत शाळेत येण्यासाठी विलंब होतो. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास शाळेतून बाहेर पडलेल्या बस शाळेत पुन्हा येण्यास जवळपास सायंकाळचे ५-५.३० वाजले. त्यामुळे सायंकाळी सुटणाºया विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी विलंब झाला. त्यातूनच मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारणपणे ४० मिनिटांची तासिका असते, ती आता ३५ मिनिटांची होणार आहे. मधली सुट्टी ही ३० मिनिटांची असते ती आता १५ मिनिटे करण्यात आली आहे. त्यामुळे ५५ मिनिटांची बचत होणार आहे. शाळेतून बस आता ५.४० एवजी ५.२० मिनिटांनी सुटतील. त्यामुळे बस वेळेत स्टॉपवर जातील, अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली. कोंडी सुरळीत झाल्यानंतर तातडीने वेळापत्रक सुरळीत होणार आहे. त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
काटई परिसरात गुरुवारी एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुरुस्ती केली जात होती. त्यात वाहने अडकून पडली. प्रशासनाचे चुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी याचा फटका नागरिकांना बसत आहे. एकाच वेळी रस्त्याच्या एकाच बाजूची दुरुस्ती हाती घ्यावी. टप्प्याटप्प्याने काम करावे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील, असे पंडित म्हणाले.कल्याण-शीळ रस्ता खड्ड्यांतच; पत्रीपूल, सूचकनाका, नेतिवली परिसरात चाळणचच्कल्याण : केडीएमसीने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू केले आहे. मात्र, एमएसआरडीसीला महत्त्वाच्या असलेल्या कल्याण-शीळ मार्गावर कल्याण पूर्व परिसरातील खड्डे बुजवण्यास अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे अजूनही येथे कोंडी होत असून त्यातून सुटका होणार कधी, असा सवाल केला जात आहे. केडीएमसी, पीडब्ल्यूडी तसेच एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाºया रस्त्यांची पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांनी पुरती चाळण झाली आहे.च्गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून जलदगतीने खड्डे भरण्याची कामे होणे अपेक्षित होते, पण तसे न झाल्याने खड्डे कायम आहेत. परंतु, गणेशोत्सव तोंडावर आल्याने उशिरा का होईना केडीएमसीने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. तर, काही ठिकाणी डांबरीकरणालादेखील प्रारंभ केला आहे. १० सप्टेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्यात यावेत, असे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकाºयांना दिले आहेत.च्शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अन्य पदाधिकारीही खड्डे बुजवायला रस्त्यावर उतरले असून या रस्तेदुरुस्तीच्या कामांना वेग आल्याचे चित्र महापालिका क्षेत्रात पाहावयास मिळत आहे. याउलट, पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत असलेला घरडा सर्कल ते खंबाळपाडा रस्ता असो अथवा एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येणाºया कल्याण-शीळ रस्त्यावरील पत्रीपूल, सूचकनाका, नेतिवली, गोळवली, दावडी, सोनारपाडा या परिसरांत खड्ड्यांची समस्या कायम आहे.च्खड्ड्यांच्या धक्कयाबरोबरच वाहनांमुळे उडणाºया धुळीच्या त्रासालाही वाहनचालक आणि पादचाºयांना सामोरे जावे लागत आहे. कल्याण पूर्वेकडील हाजीमलंग रस्त्यावरील चेतना हायस्कूलजवळदेखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. २७ गावांचा भाग असलेल्या एमआयडीसी निवासी भागातही रस्त्यांची खड्ड्यांनी पुरती दयनीय अवस्था झाली आहे. येऊ घातलेला गणेशोत्सव पाहता लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करावेत, अशी मागणी होत आहे.अन्यथा अधिकाºयांना खड्ड्यांत बसवू१० सप्टेंबरपर्यंत खड्डे न बुजवल्यास अधिकाºयांना त्या खड्ड्यांत बसवू, असा इशारा कल्याण पूर्वेतील मनसेने दिला. गुरुवारी दुपारी खड्ड्यांच्या निषेधार्थ ‘ड’ प्रभाग कार्यालयावर उल्हास भोईर, अनंता गायकवाड, संजय राठोड, योगेश गव्हाणे, स्वाती कदम या पदाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. काटेमानिवली, खडेगोळवली, वालधुनी उड्डाणपूल, पुणे लिंक रोडवरील जरीमरी गेटसमोर खड्डे पडल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. गेल्या महिन्यात मनसेने खड्ड्यांची लाज वाटावी, म्हणून महापालिका अधिकाºयांना लाजाळूचे झाडही दिले होते. दरम्यान, जर त्वरित खड्डे न बुजवल्यास खड्ड्यांत बसवू, असा इशारा अधिकाºयांना मोर्चाच्या वेळी देण्यात आला. मोर्चाच्या दणक्याने प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवायला घेतल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.खड्डे बुजवण्यासाठी खासदार, महापौर रस्त्यावर; पावसाने विश्रांती घेताच कामे सुरूडोंबिवली : खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडी तसेच अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी रात्रीपासून खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे यावेळी उपस्थित होत्या. कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी दिवसभरातही अनेक ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली खड्डे बुजवण्यात आले.खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मुंब्रा बायपास रस्ता बंद असल्यामुळे कल्याण-शीळ मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. परिणामी, कोंडीत भर पडत आहे. बुधवारी पावसाने विश्रांती घेताच खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाला. यावेळी ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे, केडीएमसीतील नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.शीळफाटा, काटईनाका, बदलापूर रोड जंक्शन, मानपाडा जंक्शन, टिळक पुतळा ते मंजुनाथ विद्यालय, कल्याण पूर्वेतील वालधुनी पूल अशा विविध ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम ठामपा, केडीएमसी, राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. शहाड उड्डाणपूल आणि म्हारळपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचीही पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांसह त्यांनी केली. टिळक पुतळा ते मंजुनाथ विद्यालयादरम्यान पडलेले खड्डे बुजवण्याच्या वेळी रात्री दीड वाजेपर्यंत शिंदे उपस्थित होते.