उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात दोनच दिवसापूर्वी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला हाकलवून लावण्याचा प्रकार झाल्यानंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे. एका आदिवासी मुलाच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सोमवारी नेले असता आमच्याकडे डॉक्टर नाही, असे सांगून कळवा येथे पाठवले; पण तेथील डॉक्टरांनी सध्या येथे शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे सांगून पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. हा सगळा प्रकार व्हिडीओद्वारे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर अखेर उद्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.लॉकडाउनच्या काळात गरीब, गरजूंसह दुर्गम पाड्यावरील आदिवासी बांधवांना अन्नधान्य मिळण्यासाठी यूथ आॅफ टुडे वेल्फेअर फाउंडेशनच्या पदाधिकारी बदलापूर येथील कवट्याची वाडी येथे जेवणाचे व अन्नधान्याचे वाटप करत होते. त्या वेळी एका अदिवासी महिलेने संघटनेचे अध्यक्ष मार्शल नाडर यांच्याकडे १० वर्षांच्या मुलाचा दोन दिवसांपूर्वी हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगून रुग्णालयात नेण्याची गळ घातली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर येथील खासगी रुग्णालयात मुलाला दाखवल्यावर ४० हजार खर्च येईल, असे सांगितले. त्यांनी मुलाला घेऊन मध्यवर्ती रुग्णालय गाठले. मात्र, आमच्याकडे डॉक्टर नसल्याचे सांगून मुलाला उपचारासाठी कळवा येथे पाठवले.कळवा रुग्णालयाने मुलाला मुंबई येथे पाठविण्याचे सूचवले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुंबई ऐवजी इतर ठिकाणी सांगा, अशी विनंती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यावर त्यांनी पुन्हा उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.मुलाला पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात आणले. मात्र, शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर संस्थेच्या पदाधिकाºयांनी आदिवासी मुलाचा व्हिडीओ व घडलेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर मध्यवर्ती रुग्णालयातील हा संतापदायक प्रकार उघड झाला.>बुधवारी करणारहातावर शस्त्रक्रियायाबाबत मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी उद्या या मुलाच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले. यापूर्वीच असा निर्णय घेतला असता तर मुलावर अशी फिरण्याची वेळ आली नसती, असे समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सांगितले. रुग्णालयाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी दिला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 2:28 AM