भार्इंदर : शहरातील ३० टक्के पाणीकपातीतून स्टेमने नुकतीच कपात मागे घेतली आहे. उर्वरित एमआयडीसीची पाणीकपात रद्द करण्याची मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. त्याला एमआयडीसीने स्पष्ट नकार देऊन जलसंपदा विभागाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.मुंबई शहराला लागून असलेल्या मीरा-भार्इंदरची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याची कबुली दस्तुरखुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी (१० जानेवारी) टेंबा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात दिली आहे. त्यासाठी शहराच्या गरजेकडे लक्ष देण्याची वेळ आल्याचेही स्पष्ट केले असले तरी या शहाराला होणारा पाणीपुरवठा अद्यापही अपुराच आहे. स्टेम व एमआयडीसीकडून प्रत्येकी ८६ व ५० एमएलडी पाणीपुरवठा होत असून दोन वर्षांनी एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात ५० एमएलडीची अतिरिक्त वाढ होणार आहे. त्यामुळे त्या वेळच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची तीव्रता आणखी जाणवणार असली तरी त्यात पुरेशी वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु, होणाऱ्या पाणीपुरवठ्यातच जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार ३० टक्के व स्टेमकडून अतिरिक्त १५ टक्के अशी पाणीकपात अनुक्रमे आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१५ पासून लागू केली होती. त्यातील स्टेमची पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय ५ जानेवारीच्या बैठकीत घेतल्याने शहराला काहीसा दिलासा मिळाला. पण एमआयडीसीने मात्र दर आठवड्याच्या गुरुवार ते शुक्रवारदरम्यानच्या ४८ तासांच्या कपातीवर मात्र निर्णय घेतला नाही.
भाईंदरची पाणीकपात रद्द करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 12:41 AM