ठाणे - मे महिना सुरु होण्यापूर्वीच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ठाण्यातही आता ३० तासांचे शटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने उपलब्ध नैसर्गिक स्त्रौतांकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील विहिरींना पुनर्जिवन देण्याच्या हालचाली पालिकेने पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत. ठाणे शहराला आजच्या घडीला रोज सुमारे ४८० दशक्षल लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला हे पाणी मुबलक आहे. परंतु असे असतांनाही शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने आणि आता महापालिकेने पाणी कपात सुरु केल्याने शहरातील बहुसंख्य भागांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या शहरात दर बुधवारी तब्बल ३० तासांचे शटडाऊन घेतले जात आहे. परंतु उपलब्ध असलेल्या याच पाण्याचा वापर अनेक ठिकाणी गाड्या धुवणे, बगीचांना पाणी घालणे आणि इतर कामांसाठी केला जात आहे. दरम्यान मागील काही वर्षात शहरात पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करु लागल्याने २०१० मध्ये पालिकेने शहरात असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्यानुसार शहरात असलेल्या परंतु दुषित झालेल्या विहीरींची शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार आजच्या घडीला शहराच्या विविध भागात ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली होती. परंतु यातील काही विहीरी पडीक, वापरात नसने, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, काही विहिरी कोरड्या पडल्या होत्या, काहींमध्ये गटरांचे पाणी गेल्याने ४० टक्के भुर्गभातील पाणी साठी हा अशा विविध कारणांमुळे दुषित झाल्याची माहितीही पालिकेच्या सर्व्हेत पुढे आली होती.दरम्यान आजच्या घडीला वापरात नसलेल्या विहीरींची संख्या ही २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ वर आली आहे. या विहिरीतील पाण्याचे साठयचे मोजमाप हे ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी हे वापरास अयोग्य असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून आढळून आले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचाही निर्ष्कश काढण्यात आलेला होता. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत, त्या विहिरीतील पाणी साठी आता पालिकेला उपयोगात आणण्याचे प्रयोजन केले आहे. त्यानुसार पालिकेने यंदा पाणी टंचाई भासू नये म्हणून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरात आणण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या विहिरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या पाण्याचे शुद्धीकरण करणे विहिरींची दुरुस्थी करणे आदी कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करण्यावर पालिका देणार भर, विहिरींची पुन्हा केली जाणार सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 3:05 PM
शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने यंदासुध्दा शहरातील ३३९ विहिरींचा सफाई केली जाणार असून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे.
ठळक मुद्देवापरात नसलेल्या २१६ विहिरी शहरातविहिरीतील १.८ दशलक्ष लीटर पाणी पिण्यास अयोग्य