ठाणे : मागील दिड महिन्यापासून ठाण्यातील कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या पडत असतांना मात्र दुसरीकडे काही खाजगी रुग्णालयांकडून अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून कोरोना बाधीत किंवा इतर रुग्णांकडूनही लुट सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या तीन ते पाच किमीसाठी देखील 10 ते 15 हजार रुपये लुटले जात होते. आता प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत ठाणो शहरात खाजगी रुग्णवाहीकांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसारच भाडे आकारावे किंवा रुग्णांच्या घरच्यांनीही त्यानुसारच भाडे द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून खाजगी रुग्णालयांकडून त्यांच्याकडे असलेल्या अॅम्ब्युलेन्सच्या माध्यमातून रुग्णांकूडन लुट केली जात होती. काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये आकरले जात होते. साधे बेथनी ते सिव्हील रुग्णालयार्पयत जरी जायचे असेल तर त्यासाठी देखील अशाच प्रकारे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. या संदर्भात मनसेच्या वतीने देखील आवाज उठविण्यात आला होता. अशा प्रकारे एखाद्याला परवडत नसतांनाही त्याच्याकडून रुग्णालयांकडून ही लुट सुरु होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक मात्र यात नाक होरपळला जात होता. आता प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रसाठी ठाणो शहरात खाजगी रु ग्णवाहिकेचे भाडे दर प्राधिकरणाने पुढे दर्शविल्याप्रमाणो निश्चित केलेले आहेत. त्यानुसारच भाडे आकारणी करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.रु ग्णवाहिकेचा प्रकार :मारु ती व्हॅन (अवातानुकुलीत):00 ते 10 कि. मी. : रू. 500/-10 ते 20 कि. मी. : रू. 1000/-20 ते 30 कि. मी. : रू. 1500/-30 कि. मी. पेक्षा जास्त: रू 20/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर: रू. 50 प्रति तासटाटा सुमो व मॅटँडोर सदृश्य कंपनीने बांधीणी केलेली वाहने(अवातानुकुलीत):00 ते 10 कि. मी. : रू. 600/-10 ते 20 कि. मी. : रू. 1200/-20 ते 30 कि. मी. : रू. 1600/-30 कि. मी. पेक्षा जास्त: रू 23/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर: रू. 50 प्रति तासटाटा 407/स्वराज माझदा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने(अवातानुकुलीत):00 ते 10 कि. मी. : रू. 700/-10 ते 20 कि. मी. : रू. 1300/-20 ते 30 कि. मी. : रू. 1700/-30 कि. मी. पेक्षा जास्त: रू 25/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर: रू. 75 प्रति तासआयसीयु(वातानुकुलीत):00 ते 10 कि. मी. : रू. 2000/-10 ते 20 कि. मी. : रू. 3000/-20 ते 30 कि. मी. : रू. 4000/-30 कि. मी. पेक्षा जास्त: रू 55/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर: रू. 100 प्रति तास
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केले अब्युलेन्सचे दर, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असणारी लुट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 3:15 PM