ठाणे : येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या (रजिस्टार) कर्मचाऱ्यांची त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी 28 जुलैरोजी लेखणी बंद आंदोलना चा पवित्रा घेतला आहे. यानंतरही मागण्या विचारात न घेतल्यास बेमुदत आंदोलन अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्या कर्मचार्यांकडून देण्यात आला आहे.
सदनशीर मार्गाने याआधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही. यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी 4 ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काम बंद आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी सर्व संवर्गाच्या रखडलेल्या पदोन्न त्या तत्काळ कराव्यात याव्या या प्रमुख मागणीसह अन्य ही मागण्या लाऊन धरल्या आहेत.
या आंदोलकांपैकी प्रमुख मागण्यामध्ये मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी पदे विभागातून पदोन्नतीने भरावी, कोरोनामुळे दगावलेल्यांच्या परिवारास 50 लाखांची मदत तत्काळ देऊन परिवारातील एकास नोकरीला घ्यावे. सर्व कर्मचाऱ्यां ना 50 लाखांचा विमा कवच लागू करा. पीएमएची रक्कम कार्यालय व जनतेच्या सुविधेसाठी वापरण्यात यावी. रेरा अंतर्गत झालेल्या कारवायांना मागे घेण्यात यावे, सह दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदांचे एकत्रीकरण करा. हार्डवेअर चे साहित्य उच्च दर्जाचे द्या आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी काम बंद आंदोलन अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली छेडण्यात येणार आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक
इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान