ठाणे : मुख्य रस्ते, मोठे चौक, फूटपाथ सध्या फेरीवाल्यांनी अडविले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा केवळ फार्स केला जात आहे. परंतु, आता स्थानिक फेरीवाल्यांबरोबर महापालिका हद्दीबाहेरील फेरीवाल्यांचेही प्रस्थ शहरात वाढू लागले आहे. त्यावर उपाय म्हणून जे पालिका हद्दीत असतील, त्यांचीच नोंदणी केली जाणार आहे. जे हद्दीबाहेरील फेरीवाले नसतील, त्यांना हद्दपार केले जाणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फेरीवाला धोरणाचे कारण पुढे करीत त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल १३ एप्रिल रोजी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्यानुसार, महापौर संजय मोरे यांनी या शहरातील मुख्य रस्ते, मोठे रस्ते, चौक, फूटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर, पुढील दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन अतिक्रमण विभागानेही दिले होते. परंतु, एप्रिल महिना उलटला तरी या विभागाने केवळ कारवाईच्या नावाखाली वेळ वाया घालविला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रभारी पालिका आयुक्त सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, पालिकेने शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी सुरू केली आहे. परंतु, जून २०१४ पासून आतापर्यंत केवळ ७८०० फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून त्यांना आता कार्डांचे वाटप लवकरच केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, शहरात एकूण १८ हजारांच्या आसपास फेरीवाले असू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. येत्या काही महिन्यांत या फेरीवाल्यांची पूर्णपणे नोंदणी करण्याचे काम केले जाणार असून त्यानंतर शहरात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)विव्हीयाना फूटपाथ होणार हरित जनपथ४याशिवाय, सध्या विव्हीयाना मॉलसमोरील जो फूटपाथ फेरीवाल्यांनी व्यापला आहे, तो येत्या दोन दिवसांत फेरीवालामुक्त करून त्या ठिकाणी तीनहात नाक्याला ज्या पद्धतीने हरित जनपथ विकसित करण्यात आला आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणीदेखील जनपथ तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.४तसेच शहरातील मोठे रस्ते, मुख्य चौक, रस्ते, फूटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 1दुसरीकडे शहरात आजच्या घडीला नव्याने फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले असून यामध्ये ठाण्यातीलच नव्हे तर भांडुप, कुर्ला, घाटकोपर आदी भागांतीलही फेरीवाले बस्तान मांडून आहेत. खासकरून घोडबंदर भागात या फेरीवाल्यांचे प्रमाण अधिक आहे.2आठवडाबाजारात देखील हे फेरीवाले वाढत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारे सामावून घेतले जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पालिका हद्दीतीलच फेरीवाल्यांची नोंदणी
By admin | Published: May 07, 2015 12:14 AM