ठाणे : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे टाळेबंदी पूर्वी ज्या ग्राहकांनी खरेदी केलेल्या बीएस ४ आणि नोंदणी रखडलेल्या वाहनांच्या नोंदणीची कामे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये ३ हजार ५४० नवीन वाहनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि छोटे टॅम्पो अशा वाहनांचा समावेश असून अनेक वाहनांची नोंदणी ही आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ मार्चपासून केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केली. त्यामुळे बीएस ४ च्या नव्या वाहनांची विक्र ी पुर्णपणे ठप्प झाली होती. टाळेबंदीच्या काळात वाहनांची विक्र ी ठप्प झाल्यामुळे वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. असे असले नागरिकांनी टाळेबंदीच्या पूर्वी खरेदी केलेली आणि कर्जाच्या प्रक्रि येत अडकेल्या वाहनांची नोंदणीची कामे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी मार्गी लावली आहेत. त्याचबरोबर बीएस ४ वाहनांची ३० मार्च पर्यंत नोंद करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या आधीच टाळेबंदी लागू झाल्यामुळे या वाहनांची नोंदणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने टाळेबंदीच्या काळात रखडलेल्या बीएस ४ या वाहनांच्या नोंदणी करण्याबाबत मुदत वाढवून देण्यात आली. त्यानुसार बहुतांश बीएस ४ वाहनांची नोंदणी प्रक्रि या प्रादेशिक परिवहन विभागाने सुरु केली. त्यानुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात एकुण ३ हजार ५४० नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.यामध्ये ठाणे उपप्रादेशिक कार्यालात दोन महिन्यामध्ये १ हजार ६९० वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार ३८३ दुचाकी, १०० कार, ४० छोटे टेम्पो, ९३ तीनचाकी आणि २४ अवजड वाहनांचा समावेश आहे. तर, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे१ हजार २९० वाहनांची एप्रिल आणि मे या दोन महिन्यात नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार ५३ दुचाकी, ७३ कार, ३६ छोटे टेम्पो, ९५ तीनचाकी आणि १० अवजड वाहनांचा समावेश असून नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयाने टाळेबंदीच्या दोन महिन्यात ६६० वाहनांची नोंदणी पुर्ण केली आहे. यातील बहुतांश वाहनांची नोंदणी ही आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली. तसेच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोशल डिस्टंगसीच्या नियमनाचे पालन करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यामुळे अनेक बीएस ४ गाड्यांची नोंदणी रखडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नोंदणी करण्यात आल्या असून शासनाला या नोंदणी प्रक्रि येतून महसूल प्राप्त झाला आहे. तसेच आता, केवळ पर्यावरणाची अधिक काळजी घेणाऱ्या वाह्नांचीच नोंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टाळेबंदीमुळे रखडलेल्या नवीन वाहनांच्या नोंदी अखेर पूर्ण, दोन महिन्यात ३ हजार ५४० वाहनांच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 4:08 PM