शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ठाण्यातील १४९ निराधार मनोरुग्णांचे होणार पुनर्वसन; राज्य शासनाकडून कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 5:28 AM

मनोरुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक सोडून जातात.

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून पूर्णत: बरे झालेल्या १४९ निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसन केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाकडून ही कार्यवाही केली जात असल्याचे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून सांगण्यात आले. यात वृद्ध निराधार मनोरुग्णांचाही समावेश आहे.मनोरुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक सोडून जातात. परंतु, ते बरे झाल्यावर काहींचे नातेवाईक त्यांना परत घेऊन जाण्यासाठी फिरकतच नाहीत, तर काही असे मनोरुग्ण असतात, जे अनोळखी म्हणून कायदेशीर कार्यवाहीच्या माध्यमातून दाखल झालेले असतात. अशा निराधार मनोरुग्णांची ओळख पटत नसल्याने किंवा त्यांचा पत्ता लागत नसल्याने बरे होऊनही तेही मनोरुग्ण वर्षानुवर्षे मनोरुग्णालयातच असतात. त्यामुळे अशा मनोरुग्णांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. बरे झाल्यानंतरही अशा मनोरुग्णांचे पुढे शासनाने काय केले, यासंदर्भात ही याचिका होती. या याचिकेची दखल घेऊन शासनाकडून विविध संस्थांत या मनोरुग्णांचे पुनर्वसन केले जाणार आहे. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातून १४९ मनोरुग्णांचे पुनर्वसन होत असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रीटा परवडे यांनी सांगितले. यात ९१ महिला तर ५८ पुरुषांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील मनोरुग्णांचे वृद्धाश्रमात पुनर्वसन केले जाणार आहे. कोणत्या संस्थेत या मनोरुग्णांना पाठवायचे, याची मात्र कार्यवाही सुरू असल्याचे मनोरुग्णालयाने सांगितले. मनोरुग्णांचे पुनर्वसन झाल्यास त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येईल, त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढेल आणि स्वबळावर उभे राहून यशस्वी होतील, असा विश्वास डॉ. परवडे यांनी व्यक्त केला.- या निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसन होणार म्हणून त्यांना आॅल रोटरी क्लब आॅफ ठाणेच्या वतीने दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे किट शुक्रवारी सकाळी मनोरुग्णालयात जाऊन दिले जाणार आहे. यात चपला, बॅग्ज, टूथब्रश, टूथपेस्ट, कपडे, नॅपकीन यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल