शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

धूपबंधक बंधाऱ्यांना पुर्नपरवानगी

By admin | Published: July 02, 2017 5:42 AM

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर वसलेल्या सातपाटी, घिवली सह अन्य पाच गावासमोर उभारण्यात येणारे धूप प्रतिबंधक बंधारे

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर वसलेल्या सातपाटी, घिवली सह अन्य पाच गावासमोर उभारण्यात येणारे धूप प्रतिबंधक बंधारे महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड) नामंजूर केल्याच्या लोकमतच्या वृता नंतर शनिवारी उपसभापती माणिक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घिवली वगळता अन्य चार बंधाऱ्यांना पुनर्रपरवानगी देण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री राजेंद्र गवितांनी दिली.पालघर जिल्ह्यातील नायगाव ते झाई- बोर्डी ह्या सागरी किनारपट्टीवरील गावातील घरे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वादळी वारे, तुफानी लाटांच्या तडाख्याने वाहून जात असल्याने मच्छीमार सहकारी संस्था, ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सातपाटी (४२५ मीटर) नवापूर (१५० मीटर), आशापुरा मंदिर एडवण (१२५ मीटर),तारापूर मांगेला आळी (१३८ मीटर), घिवली ह्या पाच गावातील किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठवला होता.ह्या बंधाऱ्याला मंजुरी मिळून पावसाळ्यापूर्वीच त्यांची कामे पूर्ण करून किनाऱ्यावरील घरांना सरंक्षण द्यावे, असा हेतू या मागे होता. मात्र, सीआरझेड विभागाने ह्या बंधाऱ्यामुळे पर्यावरणपूरक तिवरांची झाडे, मासे, कासवे प्रजनन क्षेत्र, पर्यटन स्थळे आदींना बाधा येऊ शकत असल्याची कारणे देऊन ‘सीआरझेड १’ मधील नियमांचा आधार घेत ह्या बंधाऱ्यांना परवानगी नाकारली होती. मात्र या बंधाऱ्यांना नाकारण्या बाबत सीआरझेड विभागा कडून जी कारणे देण्यात आली होती. ती नियामानुसार योग्य असली तरी रद्द करण्यात आलेल्या बंधाऱ्यांना लागूच होत नसल्याची बाब लोकमतने स्पष्टपणे दाखवून दिली होती. त्यानंतर सातपाटी येथे १३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याने किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण झाला होता. शनिवारी माजी उपसभापती माणिक ठाकरे ह्यांच्या कार्यालयात माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, सातपाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन मेहेर, उपसरपंच अनिल मोरे, सदस्य विश्वास पाटील, अनिल चौधरी, मयूर म्हात्रे, सर्वोदय संस्थेचे चेअरमन रवींद्र म्हात्रे, सुरेश म्हात्रे, मच्छिमार संस्थेचे किशोर मेहेर आदी पदाधिकाऱ्यांसह सीआरझेड विभाग, मेरिटाईम बोर्ड, पत्तन विभाग, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी ह्यांची बैठक पार पडली. यावेळी बंधाऱ्याच्या उभारणी बाबत सीआरझेड विभागाने नाकारलेली परवानगी पुन्हा देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र घिवली गावाच्या किनाऱ्यालगत असलेल्या तिवरांच्या जंगलाला येणारी बाधा लक्षात घेता तूर्तास ह्या बंधाऱ्याला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे माजी राज्यमंत्र्यांनी दिली.लोकमतच्या वृत्तामुळे मिळाली अखेर परवानगीसमुद्राच्या ५ मीटरच्या उंच लाटा किनाऱ्यावरील घरांना धडकू लागल्यानंतर लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे संसार उघड्यावर पडले होते. त्यामुळे चिडलेल्या लोकांची सुरु केलेली ओरड व लोकमतने उठविलेल्या आवाजाने नेते व लोकप्रतिनिधींना जाग आली. विविध मच्छिमार संघटनांनी या प्रकरणी आवाज उठविल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याकडे धावा घेत बंधाऱ््याना नाकारण्या बाबतची अट रद्द करण्याच्या मागण्या केल्या होत्या. त्यानंतर जनतेते संताप व्यक्त होत होता.लोकमत ने पाच गावाचे धूप प्रतिबंधक बंधारे नामंजूर हे वृत्त ११ मे च्या पालघर-वसई पुरवणीत दिल्या नंतर आम्हाला बंधारे नामंजूर झाल्याचे कळले.ह्या बाबत जनतेने व लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर ह्या बंधाऱ्यांना पुन्हा परवानगी मिळाली.-बंटी मोरे, उपसरपंच