लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काही वर्षांपूर्वी गळती लागलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी मिळत असून काही कारणास्तव पक्षातून निघून गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. रेखा मिरजकर यांनी आपल्या अनेक महिला कार्यकर्त्यांसह ठाणे शहर अध्यक्ष विक्र ांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गुरुवारी प्रवेश केला. स्वगृही परतल्याने आनंद झाला असल्याची भावना मिरजकर यांनी व्यक्त केली.१९९५ मध्ये युथ काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठींनी त्यांना प्रदेश काँग्रेसमध्ये स्थान दिले होते. काही कारणास्तव काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश जनरल सेक्र ेटरी म्हणून त्यांची वर्णी लागली होती. मात्र तिथेही त्यांचे मन न रमल्याने पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून निश्चय केला होता. भविष्यात काँग्रेस पक्ष जी संधी देईन, जी जबाबदारी वरिष्ठांकडून दिली जाईल, ती स्वीकारुन पक्षासाठी काम करणार असल्याची ग्वाही पक्ष प्रवेशानंतर दिली आहे.दरम्यान,मिरजकर यांची ठाणे शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश कार्यकारणीकडे पाठविण्यात आला असल्याचे यावेळी ठाणे शहर अध्यक्ष विक्र ांत चव्हाण यांनी सांगितले. लवकरच त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.