ठाणे : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतदेहांची वाहतूक खासगी रुग्णवाहिका करत नाहीत. त्यात करोनामुळे होणाºया मृत्यूंचे प्रमाण वाढल्याने ठाण्यातील नागरिकांना महापालिकेच्या ४ शववाहिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे या शवाहिकांसाठी लागणारे कर्मचारीही अपुरे असून या कसोटीच्या काळात जेथे १५ कर्मचाऱ्यांची गरज आहे तेथे फक्त १० कर्मचाºयांच्या जीवावर काम केले जात असल्याने अनेकवेळा मृतांच्या नातेवाईकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेने शववाहिका वाढवाव्यात, अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीची अंत्ययात्रा काढणे शक्य नाही. शिवाय अंत्यसंस्कारासाठी केवळ ५ ते दहा लोकांची उपस्थित राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. गर्दी टाळण्यासाठी नागरिक अंत्ययात्रा काढण्याऐवजी शववाहिकेलाच बोलवले जाते. पण महापालिकेच्या हद्दीत केवळ चार शववाहिका अन दहाच कर्मचारी असल्याने अनेकदा मयताच्या नातेवाईककांना शववाहिका उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागत आहे.
शहरात ७५ कोरोना मृत्यू
च्शहरात आतापर्यंत करोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारहून अधिक करोनाबाधित आहेत. या भीषण परिस्थितीत महापालिकेकडे अपुºया रुग्णवाहिका आणि शववाहिका आहेत. चार शववाहिकेमधील २ शववाहिकामध्ये कोव्हिड तर दोन शववाहिकेत नॉन कोव्हिड मृतदेह नेले जात आहेत.
च्दररोज सुमारे दहाहून अधिक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात येतात. त्यामुळे या करोनाच्या काळात महापालिकेने टीएमटी बसेसमध्ये बदल करून त्यांचा शववाहिका म्हणून उपयोग करÞण्याचा विचार करावा, अशी मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.