लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडीतील इमारत दुर्घटना दुर्देवी असून इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी क्लस्टर योजनेला स्थानिकांनी सहकार्य केले पाहिजे, तरच यातून मार्ग निघेल आणि अशा दुर्घटना होणार नाहीत. क्लस्टर योजना सर्व ठाण्यात राबविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे . या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.राबोडी परिसरातील खत्री अपार्टमेंट या तळ अधिक चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग रविवारी पहाटे ६ वाजता कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू तर एक दहा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. याठिकाणी पालकमंत्री शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापौर नरेश म्हस्के यांनीही भेट देऊन पाहणी करीत स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. अचानकपणे अशा प्रकारच्या घटना जेंव्हा घडतात, तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही हतबल होतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात न घालता धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी तात्काळ स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले. दरम्यान, या दुर्घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असून चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यानी ‘लोकमत’ ला दिली.
राबोडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने मदत केली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 1:08 AM
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ठळक मुद्देपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासनदुर्घटना टाळण्यासाठी क्लस्टर योजनेला सहकार्य करण्याचेही आवाहन