ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उल्हासनगरच्या नागरिकांनी जटिल समस्या सोडवण्यासाठी भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना साकडे घातल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात भाजपाही आघाडीवर असून, पाटील यांच्याकडे या महापालिकेची जाबाबदारी दिल्यामुळे त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्षेत्रातील या समस्या येथील नागरिकांनी भाजपा खासदाराकडे व्यक्त केल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. शहर विकासाकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थिताना दिले. भाजपा मंडळ ५चे अध्यक्ष विजय गेमनानी यांच्या निवासस्थानी घेतलेल्या या बैठकीला उल्हास नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष राजा गेमनानी, शॉप कीपर एसोसिएशनचे बच्चा रूपचंदानी, जीन्स एसोसिएशनेचे गोपी वाधवानी आणि माजी आमदार कुमार आयलानी आदी भाजपा नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
समस्या सोडवण्यासाठी खासदारास साकडे!
By admin | Published: September 08, 2015 1:46 AM