शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

थायलंडला नोकरी सांगून म्यानमार मध्ये बंदिस्त केलेल्या तरुणाची सुटका; एजंट विरोधात होणार कारवाई 

By धीरज परब | Published: April 07, 2023 4:50 PM

थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून बेकायदा म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमार मध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे.

मीरारोड : थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून बेकायदा म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमार मध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे. तर परदेशात नोकरी देतो सांगून फसवणूक करणाऱ्या एजंटवर कारवाईसाठी पोलिसांनी तयारी चालवली आहे. 

भाईंदरच्या उत्तन येथे राहणाऱ्या परवीन शेख यांनी भाईंदरच्या भरोसा सेल कडे तक्रार दिली होती . त्यांचा मुलगा शहजान (२५) ह्याला ठाण्यातील एका एजंटने थायलंड येथे नोकरी देतो सांगून पैसे घेतले. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी एजंट ने शहजान ला आधी चेन्नई विमानतळावर पाठवले. तेथून पर्यटक व्हिसा द्वारे थायलंड मध्ये नोकरीसाठी पाठवले.  

मात्र थायलंड येथे तो पोहचल्यावर त्याला तेथे नोकरी न देता तेथून बेकायदेशीर रित्या लगतच्या म्यानमार देशात बळजबरी पाठवले. त्याचा मोबाईल काढून घेत म्यानमार मधील एका कंपनीत कॉलींग करण्याचे काम दिले. दिलेले लक्ष्य पूर्ण केले नाही तर त्याचा अमानुष छळ केला जात असे. २८ दिवसांनी त्याला मोबाईल अर्ध्या तसा साठी दिल्यावर त्याने आई परवीन हिला कॉल करून झालेली फसवणूक व केला जाणारा छळ आदींची माहिती दिली. 

शहजान नेमका कुठे आहे याची माहिती होत नव्हती. याच्यासोबत कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तो नक्की कुठे आहे व कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याबाबत परवीन यांना कोणतीही माहिती नव्हती. भाईंदर भरोसा सेलच्या प्रमुख सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबूरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या निदर्शनास प्रकार आणून दिल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे सह सेलचे सचिन तांबवे, आफ्रिन जुनैदी यांनी तपास सुरु केला. 

शिंदे यांनी भारतीय दूतावास शी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शहजान ह्याची म्यानमार येथून सुटका करण्यात आली. ३० मार्च रोजी तो मायदेशी सुखरूप परतला. या प्रकरणी ज्या एजंटने पैसे घेऊन परदेशात नोकरी देतो सांगून फसवणूक केली त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाल्या. 

नोंदणीकृत एजंट असल्याची खात्री करा पराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत परदेशात नोकरी साठी जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रोटेक्टर्स ऑफ इमीग्रंटस चे कार्यालय वांद्रे येथे आहे. परदेशात नोकरीसाठी पाठवणारे एजंट हे नोंदणीकृत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. प्रदेशात नोकरी देतो सांगून फसवणारे व पुशिंगच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या अन्य देशात पाठवण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन तेजश्री शिंदे यांनी केले आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी