ठाणे : आवक घटल्यामुळे फळभाज्या महागल्या तरी आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा लाभला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे प्रतिकिलो १० रुपयाने वधारले असून मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो या आठवड्यात ६० रुपये किलोने विकले जात आहेत. तर ५० रुपये किलोने विकली जाणारी गवार ८० रुपयाने विकली जात असून १२० रुपयाने मिळणारा मटार १५० रुपये किलोने मिळत आहे. भाव वधारण्याचे मुख्य कारण माल कमी झाल्याने तसेच आॅक्टोबर हिटमुळे भाज्या खराब झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाशी, कल्याण, नाशिक , पुणे येथून भाज्या येतात. मात्र नाशिकहून येणारी भाजी ही स्वस्त आणि ताजी असली तरी देखील ट्रान्सपोर्टेशन महाग असल्याने मुंबईत दाखल होईपर्यंत तीचे भाव वधारतात. त्यामुळे त्याचे भावही वधारलेले असतात. मागील आठवड्यात १२० रुपये किलोने विकली जाणारी मटार या आठवड्यात १५० रुपयाने विकली जात आहे. मात्र पालेभाजीचे भाव घसरल्याने मागील आठवड्यात ३० रुपयाने मिळणारी मेथीची एक जुडी या आठवड्यात २० रुपयाने मिळत आहे. गाजराचा मौसम असूनही गावठी गाजरे बाजारात विक्रीस आली नसल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले. पाऊस व अतिउष्णता या नैसर्गिक संकटांमुळे मुळातच भाज्यांची आवक कमी असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. भाजी आताचे भावमागील भाव भेंडी ४० ३० भरीत वांगी ६० ६० चायना वांगी ४० ४० कारली४०५० गवार ८० ५०प्लॉवर ५० ५०कोबी ३० ४०फरसबी ८० १२०मटार १२० १५०पालक १०(जुडी) २०(जुडी)मुळा १० (जुडी) २० (जुडी)
पालेभाज्यांमुळे सामान्यांना दिलासा
By admin | Published: November 03, 2015 1:04 AM