उल्हासनगर : महापालिका प्रशासनाने स्वच्छतेबाबत आक्रमक भूमिका घेत दंडात्मक कारवाई करणार आहे. रस्त्यावर घाण करणे, भिंतीवर थुंकणे, उघडयावर प्रातर्विधीस जाणे, रस्त्यावर लघुशंका केल्यास कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली. शहर हगणदारी मुक्त झाल्यावर ते स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रत्येक चौक व गर्दीच्या ठिकाणी कचरापेटया बसवण्यात आल्या. तसेच कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी मोफत कचºयाचे डबे घरोघरी देण्यात येणार आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या ५०० पेक्षा अधिक असून त्यांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून ५ कोटीचा खर्च करणार आहे. स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी घरोघरी सिंधी, मराठी व हिंदी भाषेत पत्रकाचे वाटप केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.आयुक्तपदी निंबाळकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एका महिन्यात शहराला कचरामुक्त केले. तसेच ओव्हरफलो झालेले डम्पिंग कॅम्प नं-५ येथील खदान भागात हलवले.कचरामुक्त शहर झाल्यानंतर त्यांनी उघडयावर प्रातर्विधीस बसणे बंद करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीत महापालिका निधी टाकून हजारो वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून दिली. तसेच काही फिरती मोबाईल स्वच्छतागृहेही उपलब्ध करून दिली.प्रलंबित पडलेले वैयक्तिक स्वच्छतागृहांचे अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन दिले. शहर स्वच्छ व हरित बनविण्यासाठी अनेक रस्त्याचे काम हाती घेत दुरूस्तीसाठी तब्बल ८ कोटीचा निधी वाढवून दिला. तसेच सफाई कामगारांच्या हजेरी पुस्तकांची तपासणी सुरू केलीआहे.
कचरा टाकल्यास याद राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:07 AM