मनस्वी पवार (११ वर्षे) : आईने माझ्याकडून दोघांचे नंबर पाठ करून घेतले आहेत. काही अडचण आल्यास दोघांपैकी एका नंबरवर संपर्क करायचे, असे सांगितले. मी दोन्ही नंबर पाठ करून ठेवले आहेत.
------------------------
मोबाइल नंबर लक्षात ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. पूर्वी मोबाइल नव्हते. त्यामुळे ते पाठ करायलाच लागत. दुसरा पर्यायदेखील नव्हता. मोबाइल नंबर पाठ करणे ही काय आवश्यक गोष्ट राहिलेली नाही. तो लक्षात ठेवायला हवे हेदेखील सर्व प्रौढांना लक्षात राहत नाही. पूर्वी डायरीमध्ये मोबाइल नंबर लिहिले जात. आता तीच डायरी मोबाइलमध्ये आली आहे आणि ही वाईट गोष्ट अजिबात नाही. जिथे मेमरी लावायला पाहिजे, तिथे प्रौढ व्यक्ती लावू शकतात. प्रौढांसाठी ही चांगली गोष्टदेखील आहे. पूर्वी आकडे पाठ करण्याची पद्धत असल्याने साठी ओलांडलेल्या पुरुषांच्या आजही समरणात मोबाइल नंबर राहतो. लहान मुलांमध्ये आकलन शक्ती ही चांगली असते, तसेच आकडे हे त्यांच्या शिकण्याचा भाग आहे आणि आई-वडिलांच्या मोबाइल नंबर पाठ असणे ही आता गरजदेखील आहे. म्हणून त्यांच्या स्मरणात मोबाइल नंबर राहतो.
- डॉ. आनंद नाडकर्णी, सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ