शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

महेश आहेर यांच्याकडील अतिक्रमण विभाग काढा; काँग्रेस आक्रमक, आयुक्तांना पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 7:09 AM

वाद चिघळण्याची शक्यता

ठाणे : महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडील अतिक्रमण विरोधी विभागाच्या कारभारावरून वाद झाल्याने विधिमंडळात मुद्दा गाजल्यानंतरही आहेर यांच्याकडील अतिक्रमण विरोधी विभागाचा कार्यभार काढण्यात न आल्याने वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आहेर यांना उच्चपदस्थांचा आशीर्वाद असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांना यामुळे पुष्टी मिळत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्र लिहून आहेर यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढण्याची मागणी केली.

आहेर यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सातत्याने आवाज उठविला होता. यासंदर्भात अधिवेशनात चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. चौकशी होईपर्यंत त्यांचा पदभार काढण्याचे आश्वासनही अधिवेशनात दिले होते. ठाणे महापालिकेने त्यांच्याकडील कार्यालयीन उपाधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला; परंतु त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार तसाच ठेवला आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे.

ज्या मुद्यावरून मागील काही महिने आवाज उठविण्यात आला होता. त्यावरून कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आहेर यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. आहेर हे सध्या उपखातेप्रमुख पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे  २२/०७/२०२१ रोजी सहायक आयुक्त उथळसर प्रभाग समिती व  १/४/२०२२ रोजी सहायक आयुक्त (अतिक्रमण) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.

उपखातेप्रमुख पदावर नेमणूक करावी

एमसीएसआरमधील तरतुदी व शासन निर्णय ५/९/२०१८ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तसेच एकापेक्षा अधिक समकक्षकालीन पदांचा कार्यभार व कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पदापेक्षा दोन पद वरच्या पदाचा कार्यभार देता येत नाही अशी तरतूद आहे. आहेर यांना दिलेल्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार त्वरित काढावा व त्याची नेमणूक पुन्हा उपखातेप्रमुख पदावर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेस